खरेदी-विक्रीचा खोळंबा; सर्व्हर डाऊन

खरेदी-विक्री व्यवहारात जमीन महसूल विभागात सर्व्हर स्लो असल्याने अडचणी येत आहेत.
खरेदी-विक्री व्यवहारात जमीन महसूल विभागात सर्व्हर स्लो असल्याने अडचणी येत आहेत.

नगर ः  सध्या दस्तनोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन अभिलेखचा सर्व्हर स्लो असल्याची बोंब नित्याचीच बाब झाली आहे. खरेदी-विक्रीचा व्यवहार म्हटले की लोकांना अंगावर काटाच येतो. तास्‌न तास नागरिकांना ताटकळत बसावे लागते. खरेदी-विक्रीचे व्यवहार गतीने होणे आवश्‍यक आहे; परंतु त्याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. 'सव्हर डाऊन' चे कारण पुढे करत मालमत्ता खरेदी-विक्रीसोबत सातबाऱ्यावर मालमत्तेच्या नोंदी करण्यासाठीही लोकांना चकरा माराव्या लागत आहेत.  मुद्रांक विभागातून राज्याच्या तिजोरीत दुसऱ्या क्रमांकाचा महसूल गोळा होतो. जिल्ह्यात २०११ पासून मुद्रांक शुल्क इष्टांकमध्ये सातत्याने वाढ झाली. निश्‍चित केलेल्या मुद्रांकाची लक्षणीय वसुली होत आली. मात्र, दस्तनोंदणीसाठी मंद गतीने चालणाऱ्या सर्व्हरमुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अडचण निर्माण होत आहे. नगर जिल्ह्यातील १४ तालुक्‍यात १७ कार्यालये आहेत. त्यातील ३ कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आहे. मात्र, प्रशासनाला नागरिकांची हेळसांड दिसत नाही. विचारणा झाल्यास 'सव्हर डाऊन' असल्याचे सांगितले जाते. खरेदी-विक्री व्यवहारात जमीन महसूल विभागात सर्व्हर स्लो असल्याने अडचणी येत आहेत. राज्य विभागाच्या समन्वयक विभाग यातून लवकरच मार्ग काढून यंत्रणा सुरळीत करण्याचा प्रयत्न असतो. हा राज्य पातळीवरचा विषय आहे.  - राजेंद्र पाटील,  मुद्रांक जिल्हाधिकारी

तक्रार, त्रुटी नसल्यास खरेदी झालेल्या मालमत्तेची नोंद सातबाऱ्यावर एक महिन्यात होते. मात्र, मध्यल्या काळात नोंदीच्या सर्व्हरला वेग नव्हता. आता अडचणी सुटल्या आहेत. - उमेश पाटील, तहसीलदार, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com