agriculture news in Marathi, land slide in Varna and Krushna basin, Maharashtra | Agrowon

वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू लागल्या
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीचा पूर ओसरत असताना या नदीकाठी असणाऱ्या शेतजमिनी आता कोसळू लागल्या आहेत; तर काही भागात पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेक ठिकाणी शेतीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीचा पूर ओसरत असताना या नदीकाठी असणाऱ्या शेतजमिनी आता कोसळू लागल्या आहेत; तर काही भागात पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेक ठिकाणी शेतीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले. त्यात कृष्णा आणि वारणा नदीकाठी असलेली शेती वाहून गेली. या वेळी पाण्याचा प्रवाह मोठा आणि वेगाचा असल्याने नदीच्या वळणावर मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे भाग वाहून गेले. आता पाणी कमी झाले आहे. त्यामुळे माती ठिसाळ बनली असून शेतीचे शिल्लक राहिलेले भागदेखील पडू लागले आहेत; तसेच अनेक ठिकाणी नदीने पात्र बदलले आहे. ज्यांची शेती नदीकाठापासून दूर होती, त्या ठिकाणी नदीचे पाणी पोचल्याने ती शेती पाण्याखाली गेली. परिमाणी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सन २००५ मध्ये आलेल्या पुराने नदीकाठावरील जमिनीचे मोठे नुकसान केले होते. त्या वेळी शेतकऱ्यांना तोकडी मदत मिळाली होती. आतातरी भरीव मदत मिळणार का, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागला आहे. यामध्ये पावसाळ्यात नदीचा गाळ साठून पुन्हा उपसलेला डबरा भरेल, अशी त्याची धारणा असते. मात्र या पुराने ती फोल ठरवली. 

माती, वाळूउपशामुळे शेतीला फटका
महापूर येऊन गेल्यानंतर वारणा आणि कृष्णा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा झाला. ठेकेदारांनी यंत्राने दिवसरात्र उपसा केला. नदीच्या तळापर्यंत खरडून वाळू उपसली. अगदी पाचशे-हजार फुटावर ठेका घेऊन नदीच्या दोन्ही बाजूंनी नदीतील वाळू नेण्यात आली. वर्षाला चढ्या दराने त्याचा ठेका दिला गेला. नदीतील वाळू संपल्यावर सरकार जागे झाले आणि त्याची अधिकृत उपसाबंदी झाली. त्यात भर म्हणून वीटभट्ट्यांसाठी मातीचा बेसुमार उपसा झाला. नदीलगतची वाळूमिश्रित पोयट्याची माती वीट बनविण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे या मातीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...
राज्यात नवे जलधोरणपुणे : राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती...
कृषी विभाग उभारणार गाव पातळीवर शेतकरी...नागपूर ः ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांकरिता...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
शेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...
कुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...