Satara Landslide : साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू 

गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित झाली असून, ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
भूस्खलनात साताऱ्यात  आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू  Landslide in Satara So far 32 people have died
भूस्खलनात साताऱ्यात  आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू  Landslide in Satara So far 32 people have died

सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित झाली असून, ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३ हजार २४ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जणांना स्थलांतरित करण्यात आलेले आहेत. एनडीआरएफची एक टीम कार्यरत असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.  जिल्ह्यातील एकूण १६७ गावे पूर्णत: व २१२ गावे अंशत: अशी एकूण ३७९ गावे बाधित झाली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील ४४ गावे पूर्णत: व सात गावे अंशत: अशी एकूण ५१ गावे बाधित झाली आहेत. कराड तालुक्यातील एकूण ३० गावे अशत: बाधित झालेली आहेत. पाटण तालुक्यातील १० गावे पूर्णत: व ६० गावे अंशत: अशी एकूण ७० गावे बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील ११३ गावे पूर्णत: बाधित, सातारा तालुक्यातील १३ गावे अंशत: बाधित, जावली तालुक्यातील १०२ गावे अशत: बाधित झाली आहेत. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत एकूण ३२ जणांचा मृत्यू झाला तसेच तर ३ हजार २४ पशुधनांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यातील वाई, कराड पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील एकूण १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये वाई तालुक्यातील ७२ कुटुंबातील ३९० जण, कराड तालुक्यातील ८७६ कुटुंबातील ३ हजार ८३६ जण, पाटण तालुक्यातील ३२५ कुटुंबातील १ हजार ३०० जण, महाबळेश्वर तालुक्यातील ५१ कुटुंबातील १३० जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या एकूण एनडीआरएफच्या तीन टीम कार्यरत आहेत. आणखी एका टीमची मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याधिकारी यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com