Agriculture news in marathi Landslide in Satara So far 32 people have died | Page 2 ||| Agrowon

साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित झाली असून, ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित झाली असून, ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३ हजार २४ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जणांना स्थलांतरित करण्यात आलेले आहेत. एनडीआरएफची एक टीम कार्यरत असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली. 

जिल्ह्यातील एकूण १६७ गावे पूर्णत: व २१२ गावे अंशत: अशी एकूण ३७९ गावे बाधित झाली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील ४४ गावे पूर्णत: व सात गावे अंशत: अशी एकूण ५१ गावे बाधित झाली आहेत. कराड तालुक्यातील एकूण ३० गावे अशत: बाधित झालेली आहेत.

पाटण तालुक्यातील १० गावे पूर्णत: व ६० गावे अंशत: अशी एकूण ७० गावे बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील ११३ गावे पूर्णत: बाधित, सातारा तालुक्यातील १३ गावे अंशत: बाधित, जावली तालुक्यातील १०२ गावे अशत: बाधित झाली आहेत. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत एकूण ३२ जणांचा मृत्यू झाला तसेच तर ३ हजार २४ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यातील वाई, कराड पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील एकूण १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये वाई तालुक्यातील ७२ कुटुंबातील ३९० जण, कराड तालुक्यातील ८७६ कुटुंबातील ३ हजार ८३६ जण, पाटण तालुक्यातील ३२५ कुटुंबातील १ हजार ३०० जण, महाबळेश्वर तालुक्यातील ५१ कुटुंबातील १३० जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या एकूण एनडीआरएफच्या तीन टीम कार्यरत आहेत. आणखी एका टीमची मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याधिकारी यांनी दिली. 

 


इतर ताज्या घडामोडी
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...