नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात आगीने वृक्षसंपदेचे मोठे नुकसान

गिरणारे, जि. नाशिकच्या : वनक्षेत्रात डोंगररांगांसह घाट माथ्यावरील वनसंपदा वाढत्या वनव्याच्या घटनांमुळेधोक्यात आलीआहे.
Large damage to tree resources by fire in western belt of Nashik
Large damage to tree resources by fire in western belt of Nashik

गिरणारे, जि. नाशिकच्या : वनक्षेत्रात डोंगररांगांसह घाट माथ्यावरील वनसंपदा वाढत्या वनव्याच्या घटनांमुळे  धोक्यात आली  आहे. एकीकडे पर्यावरण विभाग कोट्यवधी झाडे लावण्यासाठी आवाहन करते. त्यासाठी मोठा शासकीय निधी, कंपन्यांचा सामाजिक निधी वृक्षारोपणासाठी खर्च होतो. मात्र, वनक्षेत्रातील असुरक्षिततेमुळे, वनविभागाच्या दुर्लक्षाने यंदाही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून  जंगलसंपदा व जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. 

नाशिकच्या पश्चिमेकडील साप्ते, रोहिले नजीकच्या हजारो हेक्टर वनक्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यंदा ही तीन दिवसापूर्वी वणवा लागला. ५ फुटांहून अधिक व लहान हजारोंच्या संख्येने झाडे जळून खाक झाली. कित्येक जमिनीत दडून बसलेले पक्षी, त्यांची अंडी, नैसर्गिक बीजे यात भक्ष्यस्थानी पडली. वन्यप्राणी तर येथून गायबच झाले आहेत.

दुर्ग रामशेज (ता. दिंडोरी) येथे पूर्व पश्‍चिम भागात किल्ला चारही बाजूने ८० टक्के चहूबाजूंनी जळून गेला. येथील नैसर्गिक नुकसान दरवर्षीच होत असते. दुर्ग अंकाई टंचाई (मनमाड) किल्ल्यावर ही यंदा आगी लागली.

किल्ल्याचा मोठा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे. गडकिल्ल्यांच्या परिसरासह, घाट वनक्षेत्रात संरक्षणाचा अभाव आहे. वनविभागाच्या कुठे जंगलक्षेत्रात चौक्या नाहीत. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने वनक्षेत्र दरवर्षी भक्ष्यस्थानी जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com