नांदुरा तालुक्यात भूजल पातळीत मोठी वाढ

बुलडाणा जिल्ह्यात झालेला दमदार पाऊस आणि जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीत मोठी वाढ झाली आहे. यंदा जिल्ह्याच्या भूजल पातळीत १.९८ मीटरने वाढ झाली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय विचार करता सर्वाधिक ४.१८ मीटर भूजल पातळी वाढ नांदुरा तालुक्यात झाली आहे.
Large increase in ground water level in Nandura taluka
Large increase in ground water level in Nandura taluka

नांदुरा, (जि. बुलडाणा)  : यंदा जिल्ह्यात झालेला दमदार पाऊस आणि जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीत मोठी वाढ झाली आहे. यंदा जिल्ह्याच्या भूजल पातळीत १.९८ मीटरने वाढ झाली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय विचार करता सर्वाधिक ४.१८ मीटर भूजल पातळी वाढ नांदुरा तालुक्यात झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी सततच्या कोरड्या दुष्काळामुळे जिल्ह्याची तहान टॅंकरवर भागवली गेली. पाऊसही कमी झाला होता आणि पाणी अडविण्याचे किंवा जिरविण्याच्या स्रोत अपुरे असल्याचा फटका बसला होता. पाणी उपशाचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्याची भूजल पातळी गंभीर वळणावर पोहचली होती. अशा परिस्थितीत शासनाने जलसंधारणाच्या कामाला गती देण्यासाबतच जलयुक्त शिवारची कामे जलदगतीने हाती घेतली. पावसाळ्यासोबतच परतीच्या पावसानेही दोन वर्षांत चांगली साथ दिल्याने भूजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

मागील २०१७च्या अगोदरच्या पाच वर्षांच्या जिल्ह्याच्या भूजल पातळीचा अंदाज घेता ही भूजल पातळी नगण्य अशा १.६१ मीटरने घटल्याचे दिसून आले होते. नांदुरा तालुक्याची भूजल पातळी अतिशय गंभीर वळणावर पोहचून १.९९ मीटरने घटली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत नांदुरा तालुक्यात सततच्या पाठपुराव्यातून जलयुक्त शिवार समितीचे तज्ज्ञ सदस्य, जलमित्र रामकृष्णा पाटील यांनी पुढाकार घेऊन कामे केल्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक नांदुरा तालुक्याला फायदा झाला आहे. तालुक्याच्या भूजल पातळीत ४.१८ मीटरने वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com