Agriculture news in marathi A large increase in the inflow of onion with leafy vegetables in Pune | Agrowon

पुण्यात पालेभाज्यांसह कांद्याच्या आवकेत मोठी वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 डिसेंबर 2019

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ८) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. त्यात शेवग्याची आवक मंदावल्याने दरात वाढ झाली होती. तर, पालेभाज्यांच्या आवकेत मोठी वाढ झाली होती. तसेच कांद्याची सुमारे १२५ ट्रक विक्रमी आवक झाली, तरी वाढलेले दर मात्र स्थिर राहिले.

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ८) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. त्यात शेवग्याची आवक मंदावल्याने दरात वाढ झाली होती. तर, पालेभाज्यांच्या आवकेत मोठी वाढ झाली होती. तसेच कांद्याची सुमारे १२५ ट्रक विक्रमी आवक झाली, तरी वाढलेले दर मात्र स्थिर राहिले.

परराज्यातून झालेल्या आवकेमध्ये आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ४ ट्रक कोबी, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा अवघा १ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा ४ टेम्पो, गुजरातमधून भुईमुगाच्या शेंगा सुमारे १०० गोणी, राजस्थानातून ६ ट्रक गाजर, मध्यप्रदेशातून मटार सुमारे २२ ट्रक, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून लसणाची सुमारे सहा हजार गोणी, आग्रा आणि इंदौर येथून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले १ हजार पोती, टॉमेटो सुमारे सहा हजार क्रेट, काकडी १२ टेम्पो, भेंडी १० टेम्पो, गवार ८ टेम्पो, फ्लॉवर १० तर, कोबी ८ टेम्पो, भुईमूग सुमारे ५० पोती, ढोबळी मिरची १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, पावटा १० टेम्पो, हिरवी मिरची ५ टेम्पो, जुना कांदा सुमारे १० तर, नवीन कांदा प्रत्येकी सुमारे १०० ट्रक आणि गुजरात येथून ६ ट्रक आवक झाला.  

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव

: कांदा : नवीन ६००-१०००, जुना : १००० ते १३००, बटाटा : १५०-२००, लसूण : ८००-१५००, आले : सातारी ३००-५००, भेंडी : २००-३००, गवार : गावरान, सुरती ३००-५००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : १५०-२००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : २००-२५०, काकडी : ८०-१२०, कारली: हिरवी २५०-३००, पांढरी: २००-२२०, पापडी : २००-२२०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : १४०-१८०, कोबी : ८०-१२०, वांगी : २००-४००, डिंगरी: २००-२५०, नवलकोल: १३०-१४०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी १८०-२००, जाड : ९०-१००, शेवगा : २२००, गाजर : ३००-३५०, वालवर : २००-२२०, बीट : २००-२२०, घेवडा : २५०-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी: ३००-३५०, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : २००-२५०, पावटा : २००-२५०, भुईमूग शेंग : ४५०-५००, गुजरात भुईमूग - ७००,  मटार : परराज्य २८०-३००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या 

पालेभाज्यांमध्ये रविवारी (ता. ८) कोथिंबिरीची सुमारे १ लाख ७५ हजार, तर मेथीची सुमारे २ लाख जुड्यांची आवक झाली. 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५००-१३००, मेथी : २००-५००, शेपू : १०००- १५००, कांदापात : १२०० - १८००, चाकवत : १०००-१५००, करडई : ८००-१०००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १५००- २२००, राजगिरा : ७००-८००, चुका : १०००-१२००, चवळई : ५००-८००, पालक : ६००-८००, हरभरा गड्डी ८००-१२००

फळबाजार

रविवारी (ता. ८) येथील बाजारात मोसंबीच्या नव्या बहाराची सुमारे २५, तर जुन्या बहाराची सुमारे ८ टन, संत्री ६ टन, डाळिंब सुमारे ३०० टन, कलिंगड २५ टेम्पो, खरबूज १० टेम्पो, पपई १५ टेम्पो, लिंबे सुमारे ६ हजार गोणी, पेरू ८०० क्रेटस, चिक्कू २ हजार डाग, सफरचंद सुमारे ६ हजार बॉक्स, विविध जातींच्या बोरांची सुमारे ३ हजार गोणी आवक झाली. ॲपलबेरची सुमारे दीड टन, तर द्राक्षांची सुमारे तीन टन आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : १००-१५०, मोसंबी : जुना बहार (३ डझन) : ३५०-९५०, (४ डझन ) : १८०-३३०, नवीन बहार (३ डझन) १२०-२८०, (४ डझन)- ८०-१०० संत्रा : (३ डझन) : २५०-४२०, (४ डझन ) : ८०-१८०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-७०, गणेश : ५-२०, आरक्ता १०-३०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-२५, पपई : ५-२०, चिक्कू : १००-५००, सीताफळ : २०-१२५, सफरचंद : सिमला (२५ ते ३० किलो) २०००-२५००, किन्नोर : २४००-३०००, काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) ८००-१४००़ बोरे (१० किलो) : चेकनट : ४००-५००, उमराण : १००-१२०, चमेली : १००-१२०, चण्यामण्या : ४००-४५०. ॲपल बेर -२०-२५, द्राक्षे - जम्बो (१५ किलो) -८००-१००, ताश ए गणेश -८००-१२००. 

फुले 

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-३०, गुलछडी : ३०-६०, कापरीA : २०-३०, शेवंती : ३०-८०, अ‍ॅस्टर : ६-१०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : १००-२००, लिली बंडल : १२-१६, जर्बेरा : ३०-६०, कार्नेशियन - १२०-२००. 

मासळी बाजार 

गणेश पेठेतील मासळीच्या बाजारात रविवारी (ता. ८) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ८ टन, खाडीची ३०० किलो, तर नदीच्या मासळीची ७०० किलो आवक झाली. तर, आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ६ टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. मार्गशीर्ष महिन्यामुळे मासळीची मागणी ५० टक्क्यांनी कमी झाल्याने २० टक्क्यांपर्यंत दर कमी झाले आहेत. 

खोल समुद्रातील मासळी 

(प्रतिकिलोचे भाव) :
पापलेट : कापरी : १५००-१६००, मोठे १५००, मध्यम : ९००, लहान ६००, भिला : ४५०, हलवा : ४८०- ५५०,  सुरमई : ४४०-४८०, रावस : लहान ४८०- ५५०, मोठा : ७५०,  घोळ : ५५०-६५०, भिंग : २८०, करली : २४०, करंदी : ३६०, पाला : लहान ८००, मोठे : ११००- 
१२००, वाम : लहान पिवळी ४८०-५५०, मोठी ७५०-८००, काळी : २८०-३६०, ओले बोंबील : १४०-१६०.

कोळंबी ः लहान २४०, मोठे : ४४०, जंबोप्रॉन्स : १५००, किंगप्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १५००, मोरी : लहान : २४०, मोठे : ३६०-४००, मांदेली : १२०-१६०, राणीमासा :१८०- २००, खेकडे : २००-२४०, चिंबोऱ्या : ४८० ५५०.

खाडीची मासळी :

सौंदाळे : २४०, खापी : १६०-२००, नगली : लहान ३६० ,मोठे ६००-६५०, तांबोशी : ४४०, पालू : २४०-२८०, लेपा : लहान १२० मोठे २००-२४० , शेवटे : २४०, बांगडा : लहान १६०-१८० , मोठे २४० पेडवी : ८०, बेळुंजी : १२०-१६०, तिसऱ्या :१४०- १६०, खुबे : १२०, तारली : १४०-१६०.

नदीची मासळी 

रहू :१४०- १६०, कतला : १४०-१६०, मरळ : ३६०, शिवडा : २४०, चिलापी : ८०, खवली : २८०, आम्ळी : ८०-१८०, खेकडे : २४० वाम : ५५०.

मटण 

बोकडाचे : ५६०, बोल्हाईचे : ५६०, खिमा : ५६०, कलेजी : ६२०.

चिकन 

चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०.

अंडी 

गावरान : शेकडा : ८३० डझन : ११० प्रतिनग : १०, इंग्लिश : शेकडा : ४७५ डझन : ७२ प्रतिनग : ६


इतर ताज्या घडामोडी
माणसाचे प्राचीन पूर्वज खात झाडांचे कठीण...माणसांच्या प्राचीन पूर्वजांच्या आहारामध्ये...
प्लॅस्टिकच्या सूक्ष्मकणांचे खेकड्यांवर...सागरी किनाऱ्यावरील वाळूतील प्रौढ खेकड्यांच्या...
वस्तू खरेदीची बिले पंचायत समित्यांना...पुणे  : जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभ...
जैवविविधता नोंदणीसाठी धावपळपुणे: राज्यातील खेडोपाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
नगर जिल्ह्यात कांदा दरात चढउतार; शेतकरी...नगर  ः जिल्ह्यात मागील महिन्यात कांद्याला...
नांदेड, परभणी, हिंगोलीत साडेबारा लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
सातारा जिल्ह्यातील शेतकरी सौर...सातारा  : महावितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या...
मूर्तिजापूरमध्ये कृषी अधिकारी पोचले...अकोला  ः शेतकरी विविध प्रकारची पिके घेऊन...
औरंगाबाद जिल्ह्यात शेती आधारित उद्योग,...औरंगाबाद  : जिल्ह्याचा पालकमंत्री व...
नाशिक जिल्ह्यात रब्बीची एक लाख १५ हजार...नाशिक  : जिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण १ लाख...
यवतमाळमध्ये ‘आधार’अभावी थकले कापूस...यवतमाळ  ः कापूस चुकाऱ्यासाठी बॅंक खाते आधार...
जळगाव जिल्ह्यात युरियाचा साठा संपला !जळगाव  ः खतांच्या वापरात आघाडीवर असलेल्या...
राजापुरात पावणेदोनशे क्विंटल भात खरेदीराजापूर, जि. रत्नागिरी  ः राजापूर तालुका...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लवकरच...पुणे  ः माथाडी आणि कामगार कायदा गुंतागुंतीचा...
नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?नगर ः नगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागांत उशिरा...
धरण कालवा सल्लागार समितीची आज नगरला बैठकनगर  : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या...
परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूरपरभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...