Agriculture news in Marathi Large, medium project Tudumba in Varada | Agrowon

वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंब

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी दिली आहे. या पावसाचा वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे. तर बुलडाण्यात सिंदखेडराजामध्येही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे प्रकल्पातील साठे वेगाने वाढत आहेत.

अकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी दिली आहे. या पावसाचा वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे. तर बुलडाण्यात सिंदखेडराजामध्येही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे प्रकल्पातील साठे वेगाने वाढत आहेत. मालेगाव तालुक्यातील पावसामुळे अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. प्रकल्पात आवक वाढत असल्याने दहा गेटमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यात रविवारी पातूर तालुक्यात सार्वत्रिक पाऊस झाला. यात प्रामुख्याने पातूर मंडळात २४.१ मिलिमीटर पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात तेराही तालुक्यात रविवारी पावसाने दमदार हजेरी दिली. यात प्रामुख्याने सिंदखेडराजा तालुक्यात ६९.६ मिलिमीटर पाऊस झाला.

याशिवाय संग्रामपूरमध्ये ५५.३, मेहकर ४२.२, लोणार ३३.२, खामगाव २८.५, मलकापूर २०.५,  मोताळा ११.७, नांदुरा २७.१, चिखली २०.१, बुलडाणा २७.६, देऊळगावराजा २०.२, वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ७८.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय वाशीम २५.३, रिसोड २५.१, मंगरुळपीर ११.४ मिलिमीटर पाऊस झाला. मालेगाव तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला.

मोठे प्रकल्प १०० टक्क्यांच्या मार्गावर
सोमवारी (ता. २१) अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प १०० टक्के भरल्याने १० गेटमधून विसर्ग सुरू करण्यात आला. या प्रकल्पाची क्षमता ३.४ टीएमसी असून पूर्ण साठा झाला आहे. वान प्रकल्पात २.६४ टीएमसी साठा म्हणजेच ९१.४५ टक्के साठा तयार झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात दोन टीएमसी म्हणजेच ८१.४२ टक्के तर पेनटाकळीमध्ये २.८ टीएमसी ९८.९२ टक्के आणि खडकपूर्णा प्रकल्पात ३.५ टीएमसी म्हणजेच ९२.५४ टक्केसाठा आहे.

मध्यम प्रकल्पही १०० टक्के भरले
अकोल्यातील मोर्णा, उमा, वाशीममधील सोनल, एकबुर्जी हे १०० टक्के भरले. अडाण प्रकल्पात ९४.५१ टक्के साठा झाला आहे.


इतर अॅग्रो विशेष
मोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...
देखो तो कहीं चुनाव है क्या?‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...
कंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...
इथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...
एक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...
कापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...
फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...
द्राक्ष निर्यातदार, पॅकहाउसवरील निलंबन...नाशिक: नाशिकमधून गेलेल्या ४१ कंटेनरमध्ये कीड...
हातचं सारं गेलं, आता जगावं कसं?नाशिक : यंदा वेळेवर पाऊस नसल्याने भाताची रोपे...
धानाच्या हमीभावात ११ वर्षांत केवळ एक...भंडारा: व्यवस्थापन खर्चात दरवर्षी होणारी वाढ,...
राज्यात उन्हाची तीव्रता वाढली पुणे ः राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली...
कांदा लिलाव सुरू करण्याचे आदेशनाशिक : जिल्ह्यात विविध बाजार समित्यांमध्ये...
सर्वांगीण विकासातून गुंडेगावचा झाला...गुंडेगाव (ता. जि. नांदेड) या गावाने शेती,...
कृषी उद्योजकतेची ‘एबीसी’सन २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ...
आयकर भरणाऱ्या ६५१ शेतकऱ्यांना नोटिसाशहादा, जि. नंदुरबार : आयकर भरत असूनही केंद्र...
कांद्याची कोट्यवधीची उलाढाल ठप्प नाशिक: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या दरावर...
करार शेतीची जबाबदारी कृषी विभागाकडेचपुणे: करारशेतीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर...
मॉन्सूनने घेतला देशातून निरोपपुणे ः परतीच्या पावसाला देशातून माघार घेण्यासाठी...