परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम प्रकल्पांत गतवर्षीपेक्षा अधिक पाणी

परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गतवर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.
Large, medium projects in Parbhani district have more water than last year
Large, medium projects in Parbhani district have more water than last year

परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गतवर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.

परभणी, हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या पूर्णा नदीवरील येलदरी धरणामध्ये शुक्रवारी (ता.२३) सकाळी ६९.५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला. गतवर्षी याच तारखेला ६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. सिद्धेश्वर धरणामध्ये ६९.०२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला. गतवर्षी ५४ टक्के पाणीसाठा होता.

निम्न दुधना प्रकल्पामध्ये ८३.०१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी २३.२२ टक्के पाणीसाठा होता. जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांपैकी करपरा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. मासोळी मध्यम प्रकल्पात ४२ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये अनुक्रमे ९० टक्के आणि ५५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

परभणी जिल्ह्यात सिंचन लाभक्षेत्र असलेल्या जायकवाडी प्रकल्पात यंदा आजवर ३५.६९ टक्के आणि माजलगाव धरणात ३०.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला. गतवर्षी याच तारखेला या दोन प्रकल्पांमध्ये अनुक्रमे ४१.५२ टक्के आणि ३८.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

गोदावरी नदीवरील ढालेगाव येथील उच्च पातळी बंधाऱ्यात ५१.७८ टक्के, तारुगव्हाण बंधाऱ्यांमध्ये ५४.३८ टक्के, मुद्दगल बंधाऱ्यामध्ये ५२.०२ टक्के, डिग्रस बंधाऱ्यात ५९.७१ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com