लासलगाव बाजार समितीवर महिलाराज; सभापतिपदी सोनवणे, उपसभापतिपदी बोरगुडे बिनविरोध

लासलगाव बाजार समितीवर महिलाराज; सभापतिपदी सोनवणे, उपसभापतिपदी बोरगुडे बिनविरोध
लासलगाव बाजार समितीवर महिलाराज; सभापतिपदी सोनवणे, उपसभापतिपदी बोरगुडे बिनविरोध

नाशिक : आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर इतिहासात पहिल्यांदाच महिलाराज आले आहे. गुरुवारी (ता. २९) बाजार समितीच्या सभापतिपदी सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप, उपसभापती प्रीती नवनाथ बोरगुडे यांची जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्या उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात आली.  लासलगाव बाजार समितीमध्ये सत्ताकारणावरून अविश्वास ठरावाच्या घडामोडी सुरू होत्या. त्यात २० दिवसांच्या घडामोडीनंतर नानासाहेब पाटील गटाकडून सभापती म्हणून सुवर्णा जगताप तर पंढरीनाथ थोरे गटाकडून उपसभापतिपदी प्रिती बोरगुडे म्हणून यांची निवड करण्यात आली. सुवर्णा जगताप यांची लासलगाव बाजार समितीच्या प्रथम महिला सभापतीपदी निवड झाली आहे.  बाजार समितीच्या आवारात जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सभापती पदासाठी सुवर्णा जगताप यांचा अर्ज दाखल असून, उपसभापती पदासाठी प्रीती बोरगुडे यांचा अर्ज दाखल झाल्याचे सांगितले. निवडणूक प्रक्रिया वेळेत यांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठल्याही सदस्याचा अर्ज नसल्याने या दोघांची सभापती व उपसभापतिपदी निवड झाल्याचे जाहीर केले. या वेळी बाजार समितीचे सदस्य व माजी सभापती नानासाहेब पाटील, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, नंदकुमार डागा, वैकुंठ पाटील, भास्करराव पानगव्हाणे, मोतीराम मोगल, शिवनाथ जाधव, रमेश पालवे, अनिता सोनवणे, सचिव नरेंद्र वाढवने उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com