लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष Lasalgaon Agricultural Produce Market Ignoring the basic problems of the committee
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष Lasalgaon Agricultural Produce Market Ignoring the basic problems of the committee

नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. विविध संघटनांनी या बाबत बाजार समितीस वेळोवेळी निवेदने दिले. तरी बाजार समितीने त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. तरीही याकडे लक्ष देऊन येत्या २० ते २५ दिवसांत सोडवा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांसह निफाड तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. 

बाजार समितीच्या समस्या निदर्शनास आणून देण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.२०) रोजी सभापती सुवर्णा जगताप, संचालक पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, भास्कर पानगव्हाणे, शिवनाथ जाधव, अनिल सोनवणे, रमेश पालवे, नवनाथ बोरगुडे, सचिव नरेंद्र वाढवणे यांची भेट घेत समस्या सोडविण्याबाबत निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे, बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी निवास व भोजन व्यवस्था अद्यापही नाही. स्नानगृहात व शौचालयात आवाजवी दर घेतात. जुन्या व नव्या बाजार आवाराच्या प्रवेशद्वारालगत स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळे बाजारासंबंधी सर्व घटकांना नाईलाजास्तव प्रात: विधी उघड्यावर करावे लागत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रात्रीच्या वेळेस जे शेतकरी बांधव शेतमालाच्या लिलालावासाठी मुक्कामी येतात. त्यातील शेतमाल, डिझेल व बॅटऱ्या यांच्या चोऱ्या होतात.

नवीन बाजारात कित्येक महिन्यांपासून जे धान्य पडलेले आहे. त्यामुळे शेतमालाचे ट्रॅक्टर लावण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. नवीन व जुने बाजारात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यामुळे गटारी देखील तुंबल्या आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, शेतकरी व व्यापारी वर्गास आरोग्यास धोका निर्माण होत आहे. अशा तक्रारीचा पाढाच या वेळी वाचून दाखवीत निवेदन सादर करण्यात आले. 

या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील, युवासेना उपजिल्हा प्रमुख रविराज शिंदे, गट संघटक बाळासाहेब शिरसाठ, शेतकरी मधुकर भोर, वसंतराव होळकर, जालिंदर गोजरे, राहुल गवळी, विशाल पोटे, देवेंद्र फापाळे, रवींद्र सोनवणे, केशव जाधव, मंदार खानापूरकर, सौरभ देशमुख, धनंजय कहाणे, प्रशांत जगताप, दिगंबर पाटील यांसह शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते. समस्यांची सोडवणूक येत्या समस्या २५ दिवसांत न झाल्यास शिवसेना शेतकरी बांधवांसमवेत आंदोलन करेल, याची गांभीर्याने नोंद घ्या, असा इशारा देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com