agriculture news in marathi, lasalgaon APMC chairman appeals central for lifting ban on onion export | Agrowon

केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी; लासलगाव बाजार समितीच्या सभापतींची मागणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण थांबविण्यासाठी केंद्राने कांदा निर्यातबंदी संदर्भात काढलेली अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी केंद्र शासनाकडे केली असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण थांबविण्यासाठी केंद्राने कांदा निर्यातबंदी संदर्भात काढलेली अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी केंद्र शासनाकडे केली असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

केंद्र शासनाने गेल्या २९ सप्टेंबरला कांदा निर्यातबंदी करून घाऊक व्यापाऱ्यांना ५०० क्विंटलपर्यंत व किरकोळ व्यापाऱ्यांना १०० क्विंटलपर्यंत कांदा साठवणुकीची मर्यादा घालून दिली आहे. यामुळे दिवसेंदिवस कांदा बाजारभावात घसरण होत आहे. निर्यातबंदीचा परिणाम बाजारभावावर झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने बाजार समितीने या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, कृषी व ग्रामविकासमंत्री नरेंद्रसिंग तोमर, ग्राहक संरक्षण आणि अन्न वितरण मंत्री रामविलास पासवान, खासदार भारती पवार यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सद्यस्थितीत विक्रीस येणारा उन्हाळ (रब्बी) कांदा हा येथील शेतकऱ्यांनी मार्च-एप्रिलमध्ये काढणी करून त्यांच्याकडील कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. शेतकरी त्यांच्या आर्थिक गरजेनुसार त्याची विक्री करीत आहे. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी व कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्यामुळे तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने मागणीअभावी कांदा बाजारभावात सातत्याने घसरण सुरू आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी संदर्भात काढलेली अधिसूचना रद्द करून कांदा साठवणुकीवरील मर्यादा वाढविण्याची मर्यादा काढून कांदानिर्यात बंदी उठवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
धान खरेदीत मोठी अनियमिततागोंदिया: जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून...
मराठवाड्यात खरिपाची ४८ लाख हेक्टरवर...औरंगाबाद: मराठवाड्यात यंदा ऊस वगळता खरिपाच्या...
शेतकरी न्याय प्राधिकरणासाठी हालचालींना...नागपूर : शेतकऱ्यांच्या फसवणुकीला चाप बसावा...
राज्यात बीएस्सी कृषीची प्रवेश प्रक्रिया...अकोला ः यंदा कोरोनामुळे बीएससी कृषी प्रवेश...
कोकण, मध्य महाराष्ट्राला झोडपलेपुणे ः अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या...
टोमॅटो हंगामावर संभ्रमाचे ढगनाशिक: जिल्ह्यात दरवर्षी पश्चिम पट्ट्यात खरीप...
बुलडाणा जिल्ह्यातील १४ हजार शेतकरी मका...बुलडाणा ः जिल्ह्यातील १८ हजार ६८० शेतकऱ्यांनी मका...
दूध दरप्रश्‍नी राज्याचे केंद्र सरकारला...मुंबई: राज्यातील दूध दराचा तिढा सोडवण्यासाठी...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...