Agriculture news in marathi Lasalgaon Bazar Samiti functioning again stop | Agrowon

लासलगाव बाजार समितीचे कामकाज पुन्हा बंद 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

नाशिक : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मापारी, हमाल व कर्मचारी वर्ग कामावर येत नाही. तसेच बाजार समितीतील या वर्ग व्यापारी यांच्याकडेही कामगार येत नसल्याची परिस्थिती आहे. त्यात आता लासलगाव परिसरातील गावामध्ये ‘कोरोना’बाधित रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशा परिस्थितीत मजूर टंचाई व व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समितीचे कामकाज पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

नाशिक : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मापारी, हमाल व कर्मचारी वर्ग कामावर येत नाही. तसेच बाजार समितीतील या वर्ग व्यापारी यांच्याकडेही कामगार येत नसल्याची परिस्थिती आहे. त्यात आता लासलगाव परिसरातील गावामध्ये ‘कोरोना’बाधित रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशा परिस्थितीत मजूर टंचाई व व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समितीचे कामकाज पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

लासलगाव बाजार समितीने केलेल्या जाहीर केल्यानुसार कांदा, धान्य, भुसार तेलबिया व भाजीपाला लिलाव मुख्य यार्डमध्ये होणार नाहीत. त्यानुसार शेतकऱ्यांनी गैरसोय होऊ नये यासाठी माल विक्रीसाठी आणू नये, असे सांगण्यात आले आहे. दरवर्षी बाजार समित्यांचे कामकाज मार्चअखेर व्यावहारिक कारणांसाठी बंद असतात. मात्र, बाजार समितीने मजूर टंचाई असताना पुन्हा निर्णय घेऊन कांदा लिलाव गोणीच्या माध्यमातून सुरू ठेवले होते. मात्र, आता व्यापाऱ्यांनी २ एप्रिलपर्यंत कामकाजात सहभागी न होण्याचे पत्र आहे. तर हमाल, मापारी यांनीही बेमुदत सहभागी न होण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे कामकाजात अडचणी येणार आहेत. 

बाजार समितीत जे मजूर बाहेर येतात. हे सर्व मजूर लासलगाव बाजार समितीच्या परिसरातून येत असतात. त्यामध्ये हमाल, व्यापारी, हाताळणी व प्रतवारी करणारे मजूर यांचा समावेश होतो. मात्र, ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण या परिसरातील असल्याने या गावातील ग्रामस्थांनी बाहेर पडणे बंद केले आहे. त्यामुळे मजूर टंचाईचा प्रश्न तयार झाला आहे. मात्र, बाजार समिती कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. परंतु व्यवहार बंद असल्याने कांदा उत्पादकांची मोठी गैरसोय होणार असल्याचे चित्र आहे. 
  
कामकाज सुरू होण्याबाबत प्रयत्न सुरू 
आगामी काळात लवकरच ३ एप्रिलपासून बाजार समिती कामकाज सुरू करण्याबाबत बाजार समिती प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. 


इतर बाजारभाव बातम्या
पुणे बाजार समिती मुख्य आवार रविवारपासून...पुणे : गुलटेकडी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट...
खानदेशात धान्य लिलाव बंदच जळगाव : खानदेशात अनेक बाजार समित्यांमध्ये धान्य...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १००० ते १३०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
मका खरेदीसाठी संदेश पाठवूनही खरेदी...औरंगाबाद : जिल्ह्यात सुरू झालेल्या ८ हमी...
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(...नाशिक : बागायती भागातून वाढलेला पुरवठा आणि...
कोल्हापुरात फळांची आवक घटलेलीचकोल्हापूर : बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू...
खानदेशात मका, गव्हाच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात मका व गव्हाच्या दरात सुधारणा होत...
पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने...सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सुरू...
खानदेशात कडब्याचे दर दबावात जळगाव  ः खानदेशात ज्वारी, मका, बाजरीच्या...
राहुरीत कांदा लिलाव सुरु, पण आवक, दर...राहुरी, जि. नगर : लॉकडाउनमुळे तब्बल दोन...
खानदेशात शिवार खरेदीत मक्याला १३००...जळगाव : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात मक्‍याची...
अमरावती महापालिका हद्दीत ‘फार्म टू होम...अमरावती ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तासगावला बेदाण्याचे सौदे प्रायोगिक...सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च पासून...
औरंगाबादमध्ये ज्वारी १८०० ते २०२५ रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
लातूर जिल्ह्यात १२ केंद्रांवर १ लाख २१...लातूर : जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवरून...