Agriculture news in marathi In Lasalgaon Market Committee Pomegranate auction begins | Agrowon

लासलगाव बाजार समितीत डाळिंब लिलाव सुरू 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 जून 2021

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर डाळिंब लिलावाला गुरुवारी (ता.२४) रोजी सुरुवात झाली. लिलावाप्रसंगी सुरूवातीस येवला तालुक्यातील शिरसगांव लौकी येथील गोरख बुल्हे या शेतकऱ्याचे डाळिंब ५२०० प्रती क्रेट दर मिळाला.

नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर डाळिंब लिलावाला गुरुवारी (ता.२४) रोजी सुरुवात झाली. लिलावाप्रसंगी सुरूवातीस येवला तालुक्यातील शिरसगांव लौकी येथील गोरख बुल्हे या शेतकऱ्याचे डाळिंब ५२०० प्रती क्रेट दराने अखलाख हाजी मोहम्मद जाबीर अन्सारी यांनी खरेदी केला. दिवसभरात ५१२ क्रेटची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी ४०० तर जास्तीत जास्त ५२०० तर सरासरी १८०० रुपये या प्रमाणे मिळाले.  

लिलालाचा प्रारंभ बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. लासलगावसह परिसरातील निफाड,  चांदवड,  येवला,  सटाणा,  देवळा,  कळवण,  मालेगाव, सिन्नर, कोपरगाव, राहुरी, राहाता, नेवासा, गंगापूर, वैजापूर, कन्नड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी डाळिंब या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने त्यांना माल विक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे डाळिंब लिलावास सुरूवात करण्यात आल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

डाळींब उत्पादकांनी माल योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा. वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्यात येणार आहे. डाळिंब खरेदीसाठी मोठ्या संख्येने खरेदीदार सहभागी होणार असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे योग्य दर मिळण्यास मदत होईल, असे जगताप यांनी सांगितले. 

डाळींब खरेदीस इच्छुक असणाऱ्या व्यापाऱ्यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी पूर्ण केल्यास तत्काळ परवाना देऊन पॅकिंग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले. या प्रसंगी बाजार समितीचे सदस्य रमेश पालवे, सहसचिव पी. आर. कुमावत, सहाय्यक सचिव ए. डी. गायकवाड, लिलाव प्रमुख एस. डी. डचके, एच. वाय. सोनारे, डाळिंब व्यापारी मुजम्मील अन्सारी, सैय्यद मोहसीन सैय्यद मुश्ताक, जिब्राईल नाईकवाडी,  तौसीफ बागवान, तबरेज शेख, राजू सैय्यद, कौसीक बागवान, प्रभारी एस. एस. पवार व सचिन बैरागी यांचेसह शेतकरी, मदतनीस आदी उपस्थित होते.


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५०...औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
राज्यात मूग ४००० ते ८५०० रुपये क्विंटललातुरात सरासरी ६५०० ते ६८२० रुपये  लातूर :...
औरंगाबादमध्ये बटाटे स्थिर, वांगी, मिरची...औरंगाबादमध्ये : भाजीपाल्याचे दर सगळीकडेच...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक, दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये उडदाला ५००० ते ६८०० रुपयेनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात उडीद, मुगाला उठाव, दरही तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
शेतमाल आवक वाढली, मागणी घटली, दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...