Agriculture news in marathi lashkari ali management through demonstrations in Sillod | Agrowon

सिल्लोडमध्ये प्रात्यक्षिकांतून लष्करी अळी व्यवस्थापन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पळशी ता. सिल्लोड : मका पिकावर लष्करी अळीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नेमके काय करावे, याविषयीचा जागर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने १५३ गावांत सुरू केला आहे. कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार याविषयी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बुधवारी(ता.१५) पळशी (ता. सिल्लोड) येथे हे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. 

पळशी ता. सिल्लोड : मका पिकावर लष्करी अळीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नेमके काय करावे, याविषयीचा जागर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने १५३ गावांत सुरू केला आहे. कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार याविषयी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बुधवारी(ता.१५) पळशी (ता. सिल्लोड) येथे हे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. 

रब्बीतील मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे, याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण औरंगाबाद जिल्ह्यातील १५३ गावात देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने हाती घेतला. त्यासाठीचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले होते.

खोल नांगरट, गूळ फवारणी, कामगंध सापळ्याद्‌वारे व प्रकाश सापळ्याद्‌वारे मास ट्रॅपिंग करून पतंग नष्ट करणे, निंबोळी अर्काची नियमित फवारणी करून पतंगास अंडी घालण्यापासून परावृत्त करणे, जैविक कीडनाशकाचा वापर, या कमी खर्चाच्या व महत्त्वाच्या बाबीवर शेतकऱ्यांनी लक्ष दिल्यास लष्करी अळीचे नियंत्रण शक्‍य आहे, याचे प्रात्यक्षिके दाखविण्यात येत आहेत. 

गंजेवार यांनी थेट शेतकऱ्यांना लष्करी अळीचा प्रादूर्भाव व त्याच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपायांची माहिती शेतकरी भास्कर बडक यांच्या शेतावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना दिली. पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय व्यास, कृषी सहायक मीनाक्षी ढाकरे, सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, अमोल शिंदे, पीक व्यवस्थापन तज्ज्ञ त्रिपाठी, क्षेत्रीय सहायक अनिल पवार, पंचायत समितीचे रमेश दळवी आदींची उपस्थिती होती. 


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...