हिंगोली : शहीद संतोष चव्हाण यांना अंतिम निरोप

शहीद संतोष चव्हाण यांना हिंगोलीत अंतिम निरोप
शहीद संतोष चव्हाण यांना हिंगोलीत अंतिम निरोप

हिंगोली : अमर रहे...अमर रहे...शहीद जवान संतोष चव्हाण अमर रहे...भारत माता की जय...वंदे मातरम...या देशभक्तीच्या घोषणांनी ब्राह्मणवाडा(ता. औंढा नागनाथ)चा आसमंत निनादून गेला. महाराष्ट्रदिनी बुधवारी (ता. १) गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ब्राह्मणवाडा येथील सी-६० कमांडो जवान संतोष चव्हाण यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. ३) त्यांच्या मूळ गावी ब्राह्मणवाडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

चव्हाण यांचा तीनवर्षीय सुपुत्र तेजस याने मुखाग्नी दिला. चव्हाण यांच्या पत्नी अश्‍विनी चव्हाण, लहान तीन महिन्यांचा मुलगा योगेश चव्हाण, वडील देविदास चव्हाण, आई भागूबाई चव्हाण, बहीण उषाबाई पवार, वंदनाबाई जाधव, नंदाबाई राठोड, रंजनाबाई राठोड आणि सिंधूताई राठोड यांच्यासह परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते. 

पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी साश्रुनयनांनी चव्हाण यांना अखेरचा निरोप दिला. या वेळी आमदार संतोष टारफे, तान्हाजी मुटकुळे, रामराव वडकुते, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार, राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक आर. बी. जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार अनिल माचेवाड यांनी शहीद संतोष चव्हाण यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वा‍हिली. 

सुरवातीस चव्हाण यांचे पार्थिव औंढा नागनाथ शहरात आले, त्या वेळी नागरिकांनी अमर रहेच्या घोषणा देत पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या वेळी अंत्ययात्रेत लोकप्रतिनिधी, पोलिस दलाचे अधिकारी-कर्मचारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com