खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यात

खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यात
खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यात

नंदुरबार : पपई दरांमध्ये दर आठवड्याला बदल करण्याचा प्रकार सुरूच आहे. शहादा (जि. नंदुरबार) बाजार समिती व शेतकरी संघर्ष समितीच्या शुक्रवारी (ता. २२) झालेल्या बैठकीत शनिवारपासून (ता. २३) प्रतिकिलो ५.२५ रुपये या दरात पपईच्या खेडा खरेदीचा निर्णय झाला. खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यात आहे. पपई दरांबाबत शेतकरी, व्यापाऱ्यांमधील ही दहावी बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. 

शहादा बाजार समितीत ही बैठक झाली. यापूर्वी म्हणजे शुक्रवारपर्यंत ज्या-ज्या भागात पपईची खरेदी झाली, त्यासंबंधी प्रतिकिलो ५.९१ रुपये दर दिला जावा. नवे दर शनिवारपासून लागू होतील, असेही स्पष्ट करण्यात आले. दर आठवड्याला पपईचे नवे दर शहादा येथे ठरले. याचा फटका शेतकऱ्यांनाच अधिक बसल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शहादामधील या दरांच्या तिढ्याचा परिणाम धुळे, जळगापर्यंत होत आहे. पपईची लागवड नंदुरबार, शहादा, तळोदा भागात अधिक झाली आहे. यामुळे शहादा येथे दरांबाबत अनेकदा तिढाही निर्माण झाला. परंतु एक दर किमान २० ते २२ दिवस कायम राहावा, असे का ठरले नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दुष्काळी स्थितीचा फटका पूर्व शहादा, शिरपूरमधील सातपुड्यालगचा भाग, चोपड्यातील उत्तर भागाला बसला. पपईचे पीक मागील महिन्यात चोपडा, शिरपुरात काही शेतकऱ्यांनी काढून क्षेत्र रिकामे केले. सध्या उष्णता वाढत असली तरी सायंकाळी वातावरणात गारवा असतो. यामुळे पपईला बाजारात उठाव कायम आहे. यामुळे दरांमध्ये या पुढे बदल केला जावू नये. कारण मार्चमध्ये बागा उष्णतेमुळे काढाव्याच लागतील. तोपर्यंत दर टिकून राहीले तर त्याचा लाभ शेतकऱ्यांनाच होईल, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com