सांगली जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

सांगली जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात
सांगली जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

सांगली ः साखर कारखान्यांच्या गळीत हंगामातील शेवटच्या टप्प्यातील गाळपाची स्पर्धा आता संपली आहे. राजारामबापू, सोनहिरा, क्रांती कारखाना अद्याप सुरू आहे. आठवड्यात पूर्ण हंगामाची सांगता होईल असे चित्र आहे. हंगामात जिल्ह्यातील १५ कारखान्यांनी ८० लाख टनाहून अधिक ऊस गाळप करून एक कोटी क्विंटलहून अधिक साखरेचे उत्पादन घेतले. सरासरी उतारा १२.०५ मिळाला आहे. 

ऊस दराच्या आंदोलनानंतर जिल्ह्यातील सहकारी व खासगी अशा १५ साखर कारखान्यांनी गळीत हंगामाची जोरदार सुरवात केली. दुष्काळी भागातील माणगंगा कारखाना अडचणीअभावी सुरू राहिला नाही. इतर कारखान्यांत यंदा अधिकाधिक ऊस गाळपासाठी स्पर्धा झाली. हंगाम सुरू झाल्यानंतरही एकीकडे एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू राहिले. तर दुसरीकडे हंगामही सुरू होता. एक रकमी एफआरपीच्या वादात जवळपास दोन महिने शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले. साखर आयुक्तांच्या आदेशानंतर शेतकऱ्यांना रक्कम मिळाली. तरीही एकरकमी एफआरपीच्या मुद्यावर स्वाभिमानी संघटना ठाम राहिली. 

जिल्ह्यातील पूर्व भागातील दुष्काळी परिस्थितीमुळे तेथील कारखान्यांचा हंगाम मागील दोन आठवड्यांत संपला. गत आठवड्यात काही कारखान्यांनी हंगामाची सांगता केली. हुतात्मा कारखाना प्रतिवर्षी शेवटपर्यंत सुरू राहतो, परंतु यंदा २४ दिवस अगोदरच हंगाम संपवला गेला. ऊसटंचाई, कमी उतारा आदी कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली. राजारामबापू, सोनहिरा, क्रांती या कारखान्यांचा हंगामही आठवडाभरात संपेल असे चित्र आहे. 

मागील आठवड्यातील ऊस गाळप व साखर उत्पादनाची आकडेवारी पाहिली, तर राजारामबापू कारखाना युनिट एक आघाडीवर आहे.

जिल्ह्यातील साखरचे १४ मार्चअखेर झालेले उत्पादन
साखर कारखाना  ऊस गाळप (लाख टन) साखर (लाख क्विंटल) उतारा
दत्त इंडिया ८.४३ ९.८७ ११.७१ 
राजारामबापू युनिट साखराळे ९.३१ ११.८९ १२.७६ 
विश्‍वासराव नाईक ५.९३ ७.४२ १२.५२ 
हुतात्मा किसन अहीर ५.९७ ७.४७ १२.५० 
माणगंगा ०.०७ ०.०२ ०३.६७ 
श्री महांकाली १.९४ २.०९ १०.७६ 
राजारामबापू युनिट वाटेगाव ५.४३ ६.८२ १२.५६ 
सोनहिरा ८.६१ १०.५२ १२.२१ 
क्रांती ७.८५ ९.५७ १२.१९ 
राजारामबापू-सर्वोदय ४.०३ ५.१० १२.६५ 
मोहनराव शिंदे ३.६८ ४.१३ ११.२२ 
निनाईदेवी (दालमिया) २.४३ २.९३ १२.०३ 
यशवंत-खानापूर १.५२ १.५० ०९.८७ 
केन ॲग्रो एनर्जी ३.४६ ३.९० ११.२७ 
उदगिरी शुगर ४.८१ ५.७० ११.८४ 
सद्‌गुरू श्री श्री ५.४७ ६.२० ११.३४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com