agriculture news in marathi, last tributes to Dadaji Khobragade | Agrowon

शेतकरी संशोधकाला अखेरचा निरोप
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 जून 2018

चंद्रपूर : भात वाणाचे संशोधक कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांच्यावर सोमवारी (ता. ४) त्यांच्या मूळगावी नांदेड (ता. नागभीड) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा मित्रजित खोब्रागडे यांनी चिताग्नी दिला. 

एचएमटी या पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेल्या धान वाणाचे संशोधन अल्पशिक्षित शेतकरी संशोधक दादाजी खोब्रागडे यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी तब्बल नऊ वाण विकसित करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. घरच्या परिस्थितीमुळे दादाजींना तिसरीनंतर शिक्षण सोडावे लागले होते. कुटुंबाच्या दीड एकर शेतीच्या भरवशावरच त्यांचा चरितार्थ सुरू आहे.

चंद्रपूर : भात वाणाचे संशोधक कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांच्यावर सोमवारी (ता. ४) त्यांच्या मूळगावी नांदेड (ता. नागभीड) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा मित्रजित खोब्रागडे यांनी चिताग्नी दिला. 

एचएमटी या पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेल्या धान वाणाचे संशोधन अल्पशिक्षित शेतकरी संशोधक दादाजी खोब्रागडे यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी तब्बल नऊ वाण विकसित करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. घरच्या परिस्थितीमुळे दादाजींना तिसरीनंतर शिक्षण सोडावे लागले होते. कुटुंबाच्या दीड एकर शेतीच्या भरवशावरच त्यांचा चरितार्थ सुरू आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शासनाकडे आर्थिक मदतीसाठी निवेदनाद्वारे विनंती केली. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे काही सामाजिक संस्थांनी त्यांच्या उपचारासाठी निधी संकलित केला. तब्बल सात लाख रुपयांचा निधी या माध्यमातून गोळा करून त्यांच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आला. 

उपचारा दरम्यान मृत्यू
नागपुरातील सुहास कानफाडे यांच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, गडचिरोली येथील डॉ. अभय बंग यांच्या सर्च संस्थेच्या सेवाभावी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा रविवारी (ता. ३) साडेसात वाजता मृत्यू झाला. सोमवारी (ता. ४) नांदेड (ता. नागभीड) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने नागभीड तहसीलदार माने यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...