भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
बातम्या
मागील वर्ष ठरले आजवरचे सर्वाधिक उष्ण
‘नासा’ ने २०२० हे भूपृष्ठासाठी सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याचे म्हटले आहे. तर युरोपची हवामान विषयक निरीक्षण संस्था असलेल्या कोपर्निकस नुसार मागचे वर्ष दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष होते.
पुणे : कोरोनाचे संकट, बर्ड फ्लूची साथ आणि शेतकरी आंदोलनाबाबत सरकारचा रोख हे पुरेसे नव्हते की काय म्हणून जाता जाता २०२०ने आणखी एक वाईट बातमी दिली आहे. २०१६ बरोबरच २०२०ची इतिहासातील सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली आहे.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या ‘नासा’ ने २०२० हे भूपृष्ठासाठी सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याचे म्हटले आहे. तर युरोपची हवामान विषयक निरीक्षण संस्था असलेल्या कोपर्निकस नुसार मागचे वर्ष भूपृष्ठासाठी दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष होते. या पूर्वी २०१६ हे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले होते. आता या स्थानावर २०१६ आणि २०२० या दोन वर्षांची नोंद केली गेली आहे.
२०१६ मध्ये अतिशय तीव्र स्वरूपाच्या ‘एल निनो’ मुळे जगभर तापमानात प्रचंड वाढ झाली होती. तर दुसरीकडे २०२० मध्ये ‘ला निना’ चा सौम्य प्रभाव दिसून येतो. त्यामुळे गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात तापमान वाढीला काही प्रमाणात खीळ बसली होती. तरीही गेल्या वर्षीची तापमान वाढ २०१६च्या तुल्यबळ ठरली, कारण हरितगृह वायूचे उत्सर्जन गेल्या वर्षी वाढले आहे.
त्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाकडचे सरासरी तापमान बघता गेल्या वर्षीचे तापमान १.२ ते १.३ अंश सेल्सिअसने वाढले होते.
आर्क्टिक महासागरासहित हिंद महासागराच्या मध्य भागात तापमान झपाट्याने वाढत असून ते पृथ्वीवरील सर्वाधिक तापमानांपैकी एक असल्याचे उपग्रह चित्रांवरून स्पष्ट होते. हिमालयासह जगातील इतर ठिकाणच्या हिमनद्यांच्या वितळण्याची गतीही वाढली आहे. समुद्राची पातळीही विक्रमीरित्या वाढली आहे. २०१९-२० मध्ये
महासागरांच्या तापमानातही लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. ही वाढ उपग्रहांनीही टिपली आहे. विविध संस्थांकडून उपलब्ध माहितीचा विचार केल्यास भूपृष्ठ तापमानासाठी २०२० हे एकतर आजवरचे सर्वाधिक उष्ण किंवा दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरते. २०२०च्या उत्तरार्धात ‘एल निनो’ चा प्रभाव सौम्य असतानाही तापमानवाढ झाली हा चिंतेचा विषय आहे.
निष्कर्ष काय?
एकेका वर्षाची आकडेवारी पर्यावरणासाठी महत्त्वाची नसून, समग्र विचार करता तापमानवाढीचा एकूण कलच चिंताजनक आहे. या साठी मानवनिर्मित हरितगृह वायूचे उत्सर्जन कारणीभूत असल्याचे प्राप्त माहितीवरून सिद्ध होते. हे उत्सर्जन थांबत नाही, तोवर धरती तापतच राहणार आहे.
२०२० का ठरले महत्त्वाचे?
- भूपृष्ठाचे सर्वाधिक तापमान नोंदवले
- महासागरांचेही आजवरचे सर्वाधिक तापमान
- ‘आर्क्टिक’ मध्ये बर्फाच्या प्रमाणाचा निच्चांक
- विविध हिमनद्या वितळण्याची वाढली गती
- समुद्राची पातळी वाढण्याकडे कल कायम
- हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण सर्वाधिक
- उपग्रहीय निरीक्षणांनुसार २०२० सर्वाधिक उष्ण
- 1 of 1540
- ››