Agriculture news in Marathi, Last year's purchase insurance refund is still pending | Agrowon

परभणी : गतवर्षीच्या खरिपातील विमा परतावा अद्याप प्रलंबित
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

परभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत गतवर्षी(२०१८)च्या खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, ज्वारी, बाजरी, तूर, कापूस या पिकांच्या नुकसानभरपाईबद्दल जिल्ह्यातील १ लाख ८९ हजार ३ शेतकऱ्यांना ६३ कोटी ४८ लाख ८१७ रुपये विमा परतावा मंजूर करण्यात आला. त्यापैकी १ लाख ४५ हजार ५७७ शेतकऱ्यांना ६१ कोटी ५३ लाख ७६० रुपये एवढी परताव्याची रक्कम देण्यात आली. परंतु अद्याप ४३ हजार ७८३ शेतकऱ्यांची २ कोटी १० लाख ३५ हजार ३०० रुपये एवढी विमा परताव्याची रक्कम विमा कंपनीकडे प्रलंबित राहिली आहे.

परभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत गतवर्षी(२०१८)च्या खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, ज्वारी, बाजरी, तूर, कापूस या पिकांच्या नुकसानभरपाईबद्दल जिल्ह्यातील १ लाख ८९ हजार ३ शेतकऱ्यांना ६३ कोटी ४८ लाख ८१७ रुपये विमा परतावा मंजूर करण्यात आला. त्यापैकी १ लाख ४५ हजार ५७७ शेतकऱ्यांना ६१ कोटी ५३ लाख ७६० रुपये एवढी परताव्याची रक्कम देण्यात आली. परंतु अद्याप ४३ हजार ७८३ शेतकऱ्यांची २ कोटी १० लाख ३५ हजार ३०० रुपये एवढी विमा परताव्याची रक्कम विमा कंपनीकडे प्रलंबित राहिली आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ५ लाख ८५ जार ८८५ विमा प्रस्ताव सादर करत एकूण ३ लाख ५० हजार ८२ हेक्टरवरील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस, ज्वारी, बाजरी आदी पिकांसाठी १ हजार २३३ कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकूण २८ कोटी ६३ लाख ३४ हजार १०० रुपये एवढा विमा हप्ता कंपनीकडे भरला होता.

गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यासाठी नियुक्त इफ्फको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीने पहिल्या टप्प्यामध्ये सोयाबीन, मूग, ज्वारी, बाजरी या चार पिकांच्या नुकसानीबद्दल ७ तालुक्यांतील १४ मंडळांमधील ३४ हजार २४१ शेतकऱ्यांना १९ कोटी ३८ लाख ६३ हजार २७९ एवढा पीकविमा परतावा मंजूर केला होता. तसेच जिल्ह्यातील ३८ मंडळांतील ५८ हजार ६९३ शेतकऱ्यांना १८ कोटी ७४ हजार १४५ रुपये एवढा तूर पिकाचा मध्य हंगामी (एकूण संरक्षित रकमेच्या २५ टक्के रक्कम) विमा परतावादेखील मंजूर केला होता. 

त्यानंतर पीक कापणी प्रयोगातील उत्पादनाच्या निष्कर्षानंतर १४ मंडळातील शेतकऱ्यांना कपाशीचा आणि ५ मंडळातील शेतकऱ्यांना तुरीचा विमा परतावा मंजूर करण्यात आला. तसेच ज्वारी, बाजरी, उडीद पिकांचा परतावा मंजूर करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील पीक विमा परतावा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ८९ हजार ३ पर्यंत आणि विमा परताव्याच्या रकमेत ६३ कोटी ३४ लाख रुपयांपर्यंत वाढ झाली. आजवर १ लाख ४५ हजार ५७७ शेतकऱ्यांना ६१ कोटी ५३ लाख ७६० रुपये (९६.९३ टक्के) विमा परतावा मंजूर करण्यात आला. परंतु अद्याप ४३ हजार ७८३ शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली विमा परताव्याची २ कोटी १० लाख ३५ हजार ३०० रुपये रक्कम विमा कंपनीकडे प्रलंबित राहिली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गतवर्षीचा पीक विमा परतावा मंजूर झालेली मंडळे
सोयाबीन ः परभणी, पेडगांव, जांब, सेलू, चिकलठाणा, कुपटा, वालूर, देऊळगांव गात, मानवत, केकरजवळा, कोल्हा.
मूग ः बामणी, चिकलठाणा, मानवत, कात्नेश्वर, पूर्णा.
उडीद ः चिकलठाणा.
ज्वारी ः परभणी, पेडगाव, जांब, पिंगळी, सिंगणापूर, दैठणा, झरी, बोरी, जिंतूर, चारठाणा, बामणी, सावंगी म्हाळसा, आडगाव, चिकलठाणा, देऊळगाव गात, कुपटा, वालूर, केकरजवळा, कोल्हा, मानवत, पाथरी, बाभळगाव, हदगाव, आवलगाव, सोनपेठ, गंगाखेड, महातपुरी, माखणी, चुडावा, कात्नेश्वर, लिमला, पूर्णा, ताडकळस.
बाजरी ः बोरी, जिंतूर, चारठाणा, सावंगी म्हाळसा, आडगाव, चिकलठाणा, हादगाव बु.
कापूस ः पेडगाव, जांब, सिंगणापूर, सेलू, कुपटा, वालूर, चिकलठाणा, देऊळगाव गात, केकरजवळा, मानवत, पाथरी, हदगाव, बाभळगाव, पूर्णा.
तूर ः पालम, चाटोरी, बनवस , सोनपेठ, आवलगाव.

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...