सातारा जिल्ह्यात रब्बीची ८९.६६ टक्के अंतिम पेरणी

Lastly sowing of Rabbi in Satara district was 89.66 percent
Lastly sowing of Rabbi in Satara district was 89.66 percent

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. बुधवारअखेर (ता. ६) ८९.६६ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणीची झाली आहे. ज्वारीचे क्षेत्र मात्र घटले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 

 जिल्ह्यात रब्बी पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १४ हजार ८२३ हेक्‍टर आहे. त्यापैकी एक लाख ९२ हजार ६०९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. फलटण तालुक्‍यात सर्वाधिक ३४ हजार ६७० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख ३९ हजार ११२ हेक्‍टर आहे. त्यापैकी एक लाख १५ हजार ४६५ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारी क्षेत्र घटले असून, सर्वसाधारण क्षेत्रानूसार ८३ टक्के पेरणी झाली आहे. यामुळे काही प्रमाणात चाऱ्यावर परिणाम होणार आहे.  

हरभऱ्याचे २८ हजार ६६३ हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी २७ हजार ४४९ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ९५.१० टक्के हरभऱ्याची पेरणी झाली आहे. मक्‍याचे १० हजार ९४१ हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. मक्‍याची ११ हजार ५२७ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गव्हाचे ३४ हजार १९९ हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यापैकी ३७ हजार १९९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

गहू पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. आंतरपीक म्हणून त्याकडे कल वाढला आहे. पिकांच्या अवस्था चांगल्या असल्या तरी सततच्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुढील काळात पोषक वातावरण राहिले, तर शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्‍टर) 

सातारा १७,८४९ 
जावळी ६३५४ 
पाटण १५,०१५
कऱ्हाड १३,३९४ 
कोरेगाव  २१,४००
खटाव २१,३६३
माण  ३३,१७०
फलटण ३४,६७०
खंडाळा १५,०७२ 
वाई  १३,६६६
महाबळेश्‍वर ६४८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com