Agriculture news in Marathi Late kharif onion arrives in Nashik | Agrowon

नाशिकमध्ये लेट खरीप कांद्याची आवक वाढली

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 एप्रिल 2021

जिल्ह्यात मार्चअखेर, बँक बंदमुळे रोकड अडचणी व मजूर टंचाई अशा कारणांमुळे व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांना कामकाज बंद ठेवण्याबाबत विनंती अर्ज दिले होते. त्यानुसार २७ मार्चपासून जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद होते.

नाशिक : जिल्ह्यात मार्चअखेर, बँक बंदमुळे रोकड अडचणी व मजूर टंचाई अशा कारणांमुळे व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांना कामकाज बंद ठेवण्याबाबत विनंती अर्ज दिले होते. त्यानुसार २७ मार्चपासून जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद होते. मात्र, सलग दहा दिवसानंतर बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झाले. मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली. यात लेट खरिपाची अधिक तर उन्हाळी कांद्याची आवक कमी असल्याचे पाहायला मिळाले.

मार्चच्या मध्यापर्यंत संपणाऱ्या लेट खरीप कांद्याची चालू वर्षी सुरूच आहे. त्यात उन्हाळी कांद्याच्या बियाण्यांत ३० टक्के फसवणूक झाल्याने हे अतिरिक्त उत्पादन यावर्षी आहे. त्यामुळे ही आवक १५ एप्रिलपर्यंत होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. लेट खरीप कांद्याला टीकवण क्षमता नसल्याने नुकसान होऊन प्रतवारीच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यात ३० टक्क्यांपर्यंत कांद्याचे नुकसान आहे. त्यामुळे बाजार समित्या सुरू होताच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली आहे.

त्यात लेट खरिपाची अधिक तर उन्हाळी कांद्याची आवक कमी राहिली. त्यामुळे लाल कांद्याचे दर घसरल्याचे पाहायला मिळाले. व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे लिलाव बंद राहतात, अन् अशा परिस्थितीत बाजार समित्यांचे व्यवस्थापन मूग गिळून गप्प राहते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बोलताना संताप व्यक्त केला. जिल्ह्यात विविध बाजार समित्यांमध्ये आवक अधिक असल्याने सोमवारी (ता. ५) कामकाज उशीरापर्यंत सुरू होते. त्यामुळे आवकेची आकडेवारी स्पष्ट झाली नाही.

शेतकऱ्यांच्या मोहिमेला प्रतिसाद
कांदा उत्पादकांचे नुकसान टाळण्यासाठी सोशल मीडियावर ‘रांगडा’ विकणार; उन्हाळी रोखणार’ अशी जनजागृती करण्यात आली.ज्यामध्ये नुकसान टाळण्यासाठी लेट खरीप कांदा प्राधान्याने विकावा तर टिकणारा उन्हाळी कांदा विक्रीविना थांबवावा, या आशयाचे आवाहन होते. ही मोहीम सोशल मीडियावर रविवार (ता. ४) पर्यंत राबवून कांदा उत्पादकांना आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद मिळाल्याचे आवकेवरून स्पष्ट झाले आहे.

विंचूर येथे आवक मोठ्या प्रमाणावर होती. औरंगाबाद मार्गावर निफाड व लासलगावकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूला शेतकरी वाहने घेऊन आले होते. आम्ही स्वतः मराठवाड्यातून विक्रीसाठी आलो होतो. मात्र, आवक वाढल्याचा फायदा घेत लिलाव प्रक्रियेत घाईत करून कमी दराने खरेदी केली. त्यामुळे व्यापाऱ्यांची अशी पद्धत शेतकरी विरोधी आहे
- अण्णासाहेब बोराडे, कांदा उत्पादक, हिलालपूर, ता. वैजापूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आल्याने कामात अडचणी आहेत. त्यात बाजार समित्यांचे जास्त दिवस कामकाज बंदमुळे आवक वाढून दर घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकरी व व्यापारी एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे पारंपरिक बंद ठेवण्याचे स्वरूप बदलून जास्तीत जास्त दिवस कामकाज होणे अपेक्षित आहे. व्यापारी वर्गाने सकारात्मक दृष्टिकोनातून पावले उचलायला हवी.
- जयदत्त होळकर, माजी सभापती व संचालक, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.


इतर बाजारभाव बातम्या
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव;...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये...
औरंगाबादमध्ये बाजरी, हरभरा,  मका, तूर,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर पुणे : कोरोना टाळेबंदीत चक्राकार पद्धतीने सुरू...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात सिमला मिरची, हिरवी मिरचीच्या...पुणे ः शहरातील कोरोना टाळेबंदीमधील शनिवार,...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात डाळिंब ५०० ते १२००० रुपयेकोल्हापुरात क्विंटलला ३००० ते १२००० रुपये...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...