नारायणगाव ‘केव्हीके’त अद्ययावत प्रयोगशाळा

नारायणगाव ‘केव्हीके’त अद्ययावत प्रयोगशाळा
नारायणगाव ‘केव्हीके’त अद्ययावत प्रयोगशाळा

नारायणगाव, जि. पुणे : राष्ट्रीय शेती अभियानांतर्गत नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात (केव्हीके) अद्ययावत प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. प्रयोगशाळेत माती, पाणी, पानदेठ व खतांची अचूक तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांनी दिली. 

याबाबत मेहेर म्हणाले, की केव्हीकेच्या वतीने सुमारे सुमारे ७५ लाख रुपये खर्चून अद्ययावत ऍटोमॅटिक प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. प्रयोगशाळेत माती परीक्षणात सोळा घटकांची, पाणी परीक्षणात सहा घटकांची व पानदेठ, खते परीक्षणात अन्नद्रव्यांची अचूक तपासणी करण्याची सुविधा आहे. याद्वारे माती, पाणी, पानदेठ व खते यात उपलब्ध असलेले नायट्रोजनचे प्रमाण, जस्त, लोह, तांबे, मॅंगेनीज आदी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अचूक प्रमाण काढणे शक्‍य होणार आहे.

एकूणच प्रयोगशाळेतील अद्ययावत यंत्रणेद्वारे जमीन, पाणी व पानदेठ व खतांची अचूक पत्रिका काढण्यात येणार असल्याने आधुनिक पद्धतीने शेतीपिकांचे संगोपन करणे शक्‍य होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते तीन जानेवारी रोजी या प्रयोगशाळेचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com