agriculture news in marathi, Late Prime Minister Atal Bihari Vajpayee Passes away | Agrowon

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी कालवश

वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत आज सायंकाळी ५.०५ मिनिटांनी अखेर मालवली. ९३ वर्षी एम्स रुग्णालयात त्यांनी घेतला अंतिम श्वास. देश शोकसागरात बुडाला. 

गेल्या दोन महिन्यांपासून एम्स रुग्णालयात दाखल असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची बुधवारी (ता.१५) प्रकृती अधिकच खालावल्याने देश चिंताग्रस्त झाला होता. 

नवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत आज सायंकाळी ५.०५ मिनिटांनी अखेर मालवली. ९३ वर्षी एम्स रुग्णालयात त्यांनी घेतला अंतिम श्वास. देश शोकसागरात बुडाला. 

गेल्या दोन महिन्यांपासून एम्स रुग्णालयात दाखल असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची बुधवारी (ता.१५) प्रकृती अधिकच खालावल्याने देश चिंताग्रस्त झाला होता. 

सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य काही मंत्र्यांनीही 'एम्स'ला भेट दिली. वाजपेयी गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होते. ११ जून २०१८ रोजी वाजपेयी यांना 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले होते.  गेल्या दोन दिवसांपासून त्यांना 'लाईफ सपोर्ट'वर ठेवण्यात आले आहे. 'एम्स'तर्फे वाजपेयी यांच्या प्रकृतीबद्दल अधिकृत माहितीपत्रक बुधवारी रात्री प्रसिद्ध करण्यात आले. गेल्या २४ तासांत त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे त्यात म्हटले  होते. 

वाजपेयी यांच्या प्रकृतीची माहिती समजल्यानंतर सायंकाळी ७.१५ च्या सुमारास पंतप्रधान मोदी 'एम्स'मध्ये आले. जवळपास ५० मिनिटे मोदी 'एम्स'मध्ये होते. गेल्या दोन महिन्यांत मोदी यांनी चार वेळा  'एम्स'मध्ये वाजपेयी यांची भेट घेतली.

किडनीला झालेल्या संसर्गामुळे ११ जून रोजी वाजयेपी यांना 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले होते. यापूर्वी २००९ मध्ये वाजपेयी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. 


इतर अॅग्रो विशेष
दक्षिण कर्नाटक, तामिळनाडूत मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज (ता....
कोकणात पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रात आलेल्या ‘निसर्ग’...
रविवारपर्यंत मॉन्सूनची आणखी चाल शक्य पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी...
हमीभाव मिळवून देण्यात केंद्र सरकार...पुणे: केंद्र सरकार गाजावाजा करून हमीभाव जाहीर करत...
शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बियाणे अनुदान...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बियाणे...
साखर कारखान्यांनी लॉकडाउनमध्ये जमा केली...पुणे: लॉकडाउनमधील विविध अडचणींना तोंड देत...
माझा शेतकरी, माझा अभिमान ! ७ ते १३ जून...पुणे : कोरोनाच्या कठिणकाळात जनता घरबंद असताना...
कृषी उन्नती योजनेत ६६ टक्के कपातपुणे: कृषी उन्नती योजना राबविण्यासाठी केंद्र...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
दर्जेदार हळद पावडरीचा शिनगारे यांचा...परभणी जिल्ह्यातील वालूर सारख्या ग्रामीण भागात...
शेतकरी संघटना शुक्रवारी करणार ...नागपूर ः एचटीबिटीला मान्यता मिळावी या मागणीसाठी...
विधानपरिषदेच्या ८ सदस्यांची मुदत समाप्तमुंबई: विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त ८...
चक्रीवादळाच्या तडाख्यात मधूमका भुईसपाटनाशिक: नाशिक, सिन्नर व इगतपुरी तालुक्यांमध्ये १...
सातत्य, चिकाटी, प्रयत्नांतून...कोणताही व्यवसाय यशस्वी करायचा तर सातत्य आणि...
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...