Agriculture news in marathi Late wheat may be hit by rising temperatures | Agrowon

उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा फटका शक्‍य

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती बऱ्यापैकी असून, यंदा पेरणी वाढल्याने उत्पादनही अधिक येईल, असे चित्र आहे. परंतु, उशिरा पेरणी केलेल्या गव्हाला थंडी हवी आहे. सध्या मात्र किमान तापमान २० अंश सेल्सिअसवर पोचले आहे. तर कमाल तापमानही ३१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहत असून, वाढत्या तापमानाचा गहू पिकाच्या उत्पादनाला फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती बऱ्यापैकी असून, यंदा पेरणी वाढल्याने उत्पादनही अधिक येईल, असे चित्र आहे. परंतु, उशिरा पेरणी केलेल्या गव्हाला थंडी हवी आहे. सध्या मात्र किमान तापमान २० अंश सेल्सिअसवर पोचले आहे. तर कमाल तापमानही ३१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहत असून, वाढत्या तापमानाचा गहू पिकाच्या उत्पादनाला फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

गहू पिकाची पेरणी मागील हंगामात कमी किंवा कृषी विभागाच्या अपेक्षेपेक्षा कमी झाली होती. खानदेशात गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ४५ हजार हेक्‍टर आहे. परंतु मागील हंगामात दुष्काळी स्थितीमुळे गव्हाची पेरणी फक्त तापी, गिरणा, पांझरा, वाघूर नदीच्या क्षेत्रात झाली होती. ही पेरणी फक्त सुमारे २५ हजार हेक्‍टरपर्यंत पोचली होती.

यंदा पाऊस बऱ्यापैकी झाला. सर्व प्रकल्पांमधील जलसाठाही मुबलक होता. तसेच ज्वारी, मक्‍यावर मागील हंगामात अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप वाढल्याने पीक मोडण्याची वेळ आली होती. त्यात शेतकऱ्यांना अन्य पिकांकडे वळावे लागले होते. त्यात वेळ व पैसा वाया गेला होता. यामुळे या हंगामात शेतकऱ्यांनी गहू पिकाची पेरणी करण्याचे नियोजन दिवाळीनंतर केले होते.

दिवाळीनंतर मका, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांखालील क्षेत्र रिकामे झाले. तसेच त्यापूर्वी मूग, उडदाखालील क्षेत्र रिकामे झाले होते. या क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी गहू पिकाची पेरणी सुरुवातीला केली. नोव्हेंबरच्या मध्यापासून पेरणी सुरू झाली. पेरणी जानेवारीतही झाली. कारण थंडी फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत कायम राहील, असे संकेत मिळत होते. परंतु मागील पाच - सहा दिवसांपासून किमान व कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. थंडी कमी झाली आहे.

५१ हजार हेक्‍टरवर गव्हाचा पेरा 
जळगाव जिल्ह्यात सुमारे ३५ हजार हेक्‍टर क्षेत्र असल्याचा अंदाज आहे. यापाठोपाठ नंदुरबार व धुळ्यात गव्हाची पेरणी झाली आहे. मध्यंतरी काही भागात गव्हावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप झाला होता. शेतकऱ्यांनी उपाययोजना करून अळीचा प्रकोप कमी केला. आता थंडी कमी झाल्याने दाणे पक्व होण्याची क्रिया मंद होईल. उत्पादन घटेल, असे शेतकऱ्यांचे 
म्हणणे आहे.


इतर ताज्या घडामोडी
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके...नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता....
इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे...कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी...नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या...
चाकूर तालुक्यात गारपीटीने पिके,...चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व...
बंदीवानांनी पिकवला भाजीपालाअकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत...
नांदेड जिल्ह्यात सहा हजार क्विंटल...नांदेड : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची पावणे...औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे...
अकोला पाणी टंचाईच्या उपाययोजना खोळंबल्याअकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात...
अकोला बाजार समितीत गव्हाची टोकन...अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक...
वाडेगावमध्ये शेतकऱ्यांकडून मोफत...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना सहकार्य...
लॉकडाऊनमुळे ओझोनचा थर भरतोय का?सध्या सर्वत्र एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ओझोनचा...
हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयकडे थकले...वर्धा ः सीसीआयला कापूस देणाऱ्या हिंगणघाट तालुक्‍...
नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले...देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने...
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या पोचली...नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या...
पुणे बाजार समितीत ३२५ वाहनांमधून...पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या...
इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळपुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू...
`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर पुणे...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी...