Agriculture news in marathi Latur Bazar Samiti distribute needy goods to workers | Agrowon

लातूर बाजार समितीतर्फे हमालांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

लातूर : बाजार समितीतर्फे परवानाधारक १८०० हमालांना जीवनावश्यक वस्तुंचे किट शुक्रवारी (ता. १०) वाटप करण्यात आले. 

लातूर : बाजार समितीतर्फे परवानाधारक १८०० हमालांना जीवनावश्यक वस्तुंचे किट शुक्रवारी (ता. १०) वाटप करण्यात आले. 

‘कोरोना’मुळे देशात लॉकडाऊन आहे. लातूर बाजार समितीमधील व्यवहार बंद आहेत. हातावर पोट असलेल्या हमालावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा काळात हमाल बांधवासाठी जीवनावश्यक वस्तुचे किट वाटप करा, अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी बाजार समितीच्या संचालक मंडळाला दिल्या होत्या.

 सामाजिक दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवून हमालांच्या मदतीला बाजार समिती धावली आहे. शुक्रवारी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, तहसिलदार स्वप्नील पवार, सहाय्यक निंबंधक कदम, बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा, उपसभापती मनोज पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्या हस्ते १० हमालांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळून या कीटचे वाटप करण्यात आले. त्यात गहु (आटा) तांदूळ, तेल, डाळ, चहापती, खोबरेल तेल आदी २० जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे. 

बाजार समितीचे संचालक विक्रम शिंदे, संभाजी वायाळ, सुधीर गोजमगुंडे, बाळासाहेब बिदादा, तुकाराम आडे, तात्या बेद्रे, हर्षवर्धन सवई , प्रभारी सचिव सतिश भोसले, प्रभारी सहाय्यक सहसचिव भास्कर शिंदे आदी उपस्थित होते. 
 

 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...