लातूरच्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देणार

मांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कामांना नियामक मंडळाच्या आगामी बैठकीत मंजुरी देण्यात येईल आणि या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
लातूरच्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देणार Of Latur Irrigation Project Administrative approval will be given for the works
लातूरच्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देणार Of Latur Irrigation Project Administrative approval will be given for the works

मुंबई : मांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कामांना नियामक मंडळाच्या आगामी बैठकीत मंजुरी देण्यात येईल आणि या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. लातूर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमधील कामांच्यास संदर्भात शुक्रवारी मंत्रालयात जलसंपदा मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जलसंपदा मंत्री पाटील यांनी हे आश्वासन दिले. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, जलसंपदा सचिव संजय घाणेकर, टी. एन. मुंडे, संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे संबंधित अधिकारी या बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, ‘‘सातत्याने पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या लातूर जिल्ह्यासाठी पाटबंधारे प्रकल्पांची कामे मार्गी लावण्याबरोबरच पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. लासरा बॅरेजमधील अतिरिक्त पाणी रायगव्हाण प्रकल्पात वळविण्याच्या कामाला या पूर्वी मंजुरी देण्यात आली होती.

या योजनेचा नव्याने अभ्यास करून या बाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले आहेत. मांजरा नदीवरील सर्वच बॅरेजद्वारे परिचलनासाठी ‘स्काडा’ प्रणाली बसविणे बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. त्याचप्रमाणे मांजरा धरणातील पाण्याचा अधिक कार्यक्षमतेने वापर व्हावा, यासाठी मांजरा प्रकल्पाच्या कालव्यावर बंद पाइपद्वारे पाणी वितरण प्रणाली बसविण्याचा प्रस्ताव सादर करा.’’

  वाहून जाणाऱ्या पाण्याचाही होणार उपयोग लातूर जिल्ह्यातील मांजरा व तेरणा नदीच्या संगमाजवळ बॅक वॉटर इफेक्ट स्टडी करण्यासाठी नदी खोरे अभिकरणास सूचना द्याव्यात, मांजरा धरणाच्या खाली वाहून जाणाऱ्या पाण्याचा त्याच खोऱ्यातील कोरड्या प्रकल्पासाठी वळण योजना प्रस्थापित करण्याबाबत अभ्यास करण्यात यावा, असेही बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयांचा आढावा घेण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक घेण्यात येईल, असेही जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल पालकमंत्री अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com