रोजगारासाठी पाणंद रस्त्यांची कामे सुरू करा ः राज्यमंत्री खोत
रोजगारासाठी पाणंद रस्त्यांची कामे सुरू करा ः राज्यमंत्री खोत

रोजगारासाठी पाणंद रस्त्यांची कामे सुरू करा ः राज्यमंत्री खोत

परभणी ः जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीत ग्रामीण जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय हमी योजनेतून शेतरस्ते, पाणंद रस्ते आदींची कामे प्राध्यान्याने करावीत. त्यासाठी तलाठी, ग्रामसेवकांना उद्दिष्ट देण्यात यावे. दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी दुष्काळी उपाय योजनांची अमंलबजावणी गांभीर्याने करावी, असे निर्देश कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवारी (ता. २६) आयोजित दुष्काळ नियोजन आढावा बैठकीमध्ये श्री. खोत बोलत होते. या वेळी आमदार मोहन फड, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी, महापालिका आयुक्त रमेश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे उपस्थित होते. श्री. खोत म्हणाले, ग्रामीण भागातील राष्ट्रीय पेयजल पाणीपुरवठा योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना तसेच जुन्या योजनांची कामे पूर्ण होणे गरजेचे होते. पीक कर्जवाटप, कर्जमाफीच्या रकमा, पी‍कविमा भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार बँकांनी काम करावे. त्याकडे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी लक्ष द्यावे.या वेळी त्यांनी पीक विमा योजनेच्या कार्यवाहीचा आढावा घेतला.

श्री. शिवशंकर यांनी दुष्काळी महसूल मंडळातील पाण्याचे स्राेत संरक्षित करून पाणीपुरवठ्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. श्री. पृथ्वीराज, कृषी अधिकारी श्री. शिंदे आदींनी विविध कामांची माहिती दिली. श्री. पिनाटे यांनी जिल्ह्यातील दुष्काळ उपाय योजना नियाेजनाबाबत सादरीकरण केले. बैठकीनंतर राज्यमंत्री श्री. खोत यांनी पाथरी येथीली बॅंकेसमोरच्या उपोषणादरम्यान मृत्यू मरडसगाव (ता. पाथरी) येथील शेतकरी गंगाधर काळे यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

खोत यांच्या हस्ते कृषी अवजारांचे वाटप कृषी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांस कृषी राज्यमंत्री खोत यांच्याहस्ते ट्रॅक्टर, रोटाव्हेटर वाटप करण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आजवर ९ ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, मळणीयंत्र आदी मिळून एकूण ४६ अवजारांचे वाटप करण्यात आले आहे, असे श्री. बनसावडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com