agriculture news in Marathi lawn transport stopped due to lockdown Maharashtra | Agrowon

वाहतूक परवाने नसल्याने लॉन उत्पादक अडचणीत 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 मे 2020

आमचे एकूण कुटूंबाची पाच एकरावर लॉन शेती आहे. दरवर्षी लॉन शेतीतून चांगले उत्पन्न मिळते. चालू वर्षी अनेक ठिकाणामहून लॉनसाठी मागणी येत आहे. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे लॉन वाहतुकीला परवानगी नसल्याने नुकसान होत आहे. 
- जयराम बबन ससार, लॉन उत्पादक शेतकरी, चांदे, जि. पुणे 

पुणे : लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका मुळशीतील लॉनशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या लॉन काढणीला आलेले असताना व मागणीही असताना वाहतुक परवाना नसल्याने काढणी ठप्प झाली आहे. यामुळे मुळशी तालुक्यातील लॉन उत्पादक गावातील शेतकऱ्यांचे चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच या व्यवसायात काम करणाऱ्या सुमारे दीडशे शेत मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

भातपिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मुळशी तालुक्यात काही गावांमध्ये अलीकडील काळात लॉनशेतीचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार होऊ लागला आहे. हिंजवडी आयटी क्षेत्राच्या लगतच्या चांदे, नांदे, माण, भरे, मूलखेड, म्हाळुंगे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लॉन शेती केली जाते. या गावांमध्ये अंदाजे चारशे ते साडे चारशे एकर क्षेत्रावर लॉन शेती होते. या लॉनसाठी कोकण, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा, पुणे, मुंबई, नाशिक अशा विविध भागातून मोठी मागणी आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेड झोन वगळता अनेक ठिकाणाहून लॉनसाठी मागणी आहे. परंतु लॉन वाहतूकीला परवानगी नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष घालून परवानागी द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

दरवर्षी लॉन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी चार लाख रूपयांचे उत्पन्न मिळते. तर सहा महिन्यांतून जवळपास दोन लाखाचे उत्पादन मिळते. त्यामुळे अनेक शेतकरी भात उत्पादनाऐवजी आधुनिक पद्धतीने लॉन शेती करत आहेत. यामध्ये तैवाण वाण, इलेक्शन नंबर वन, बरमोडा, अमेरिकन फ्लू अशा विविध प्रकारचे उत्पादन शेतकरी घेतात. 

चांदे येथील प्रयोगशील व लॉन उत्पादक शेतकरी प्रमोद मांडेकर म्हणाले, ‘‘माझ्याकडे एकूण आठ ते दहा एकर लॉन शेती आहे. गेल्या अकरा वर्षांपासून मी लॉनशेती करत आहे. पावसाळ्यापूर्वी एप्रिल व मे महिन्यात लॉनला मोठी मागणी असते. यंदा हंगामाच्या काळातच विक्री बंद असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. लॉनच्या विक्रीकरिता शेतीमालाअंतर्गत कृषी विभागाने वाहतूक परवाना द्यावा. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...