शिखर बँक ठरली उत्कृष्ट राज्य बॅंक

नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक (नॅफस्कॉब) या देशपातळीवरील संस्थेने महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेला २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे.
bank
bank

मुंबई: नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक (नॅफस्कॉब) या देशपातळीवरील संस्थेने महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेला २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा डिसेंबर २०२० मध्ये होणार आहे. भारतातील विविध राज्याच्या, राज्य सहकारी बँकांनी त्यांच्या वार्षिक धोरणानुसार शेतकऱ्यांसह विविध घटकांना केलेला कर्जपुरवठा, प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांना सक्षम करण्यासाठी केलेले प्रयत्न, राज्यातील जिल्हा बँकांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षणासह विविध स्तरावर केलेले प्रयत्न, केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावीपणे केलेली अंमलबजावणी, रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या मार्गदर्शक तत्त्वांचे केलेले पालन इत्यादी निकषांच्या आधारे हा पुरस्कार दिला जातो. या सर्व निकषांची पूर्तता करण्यामध्ये अग्रेसर ठरलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर, राज्य बँकेने आपल्या सर्व कर्जदारांसाठी आत्मनिर्भर कर्ज योजना आखली असून, त्याद्वारे त्यांच्या एकूण येणे कर्जाच्या २५ टक्के रक्कम त्यांना १ वर्षाच्या सवलतीच्या कालावधीसह पुढील ४ वर्षांच्या मुदतीने राबविण्यात येत आहे. अडचणीतील उद्योगांसाठी बॅंकेने कर्ज पुनर्बांधणी योजना जाहीर केली आहे. राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे पालकत्व राज्य बॅंकेने स्वीकारले असल्यामुळे, संपूर्ण सहकारी क्षेत्राचे मजबुतीकरणासाठी प्रशिक्षणासह इतर सर्व उपाय योजण्यात राज्य बॅंक आघाडीवर आहे. देशातील राज्य बँकांपैकी रिझर्व्ह बँकेकडून विदेश विनिमय व्यवहार हाताळण्याचा परवाना प्राप्त असलेली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही एकमेव राज्य सहकारी बँक आहे. राज्य सहकारी बँकेने राज्यातील नागरी सहकारी बँकांसाठी देखील विविध कर्ज योजना तयार केल्या आहेत. नुकतेच नाबार्ड कायद्यामध्ये झालेल्या बदलानुसार, पुढील काळात ग्रामीण भागातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना आवश्यक तेवढा कर्जपुरवठा करून, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणामध्ये राज्य बँकेचा मोठा वाटा राहिला आहे. राज्य बँकेने १०९ वर्षांत गाठलेले अनेक उच्चांक हे सर्व सभासद, खातेदार, हितचिंतक तसेच बॅंकेचा सेवक वर्ग यांच्यामुळे साध्य झाल्याची भावना बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केली.

बॅंकेचे विक्रमी व्यवहार बँकेने १०९ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अनेक विक्रम मोडले आहेत. त्यात प्रामुख्याने बँकेने दिलेली कर्जे २०८१७ कोटी, बँकेच्या ठेवी २०८४९ कोटी, एकूण व्यवहार ४१६६६ कोटी, बँकेचा सीआरएआर १३.११ टक्के, बॅंकेचा स्वनिधी ४७८४ कोटी, तर बँकेने ३२५ कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे. बँकेच्या अनुत्पादक कर्जाचे निव्वळ प्रमाण प्रथमच शून्य टक्के झाले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com