परभणीत महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेची पीक कर्जवाटपात आघाडी

 परभणीत महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेची पीक कर्जवाटपात आघाडी
परभणीत महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेची पीक कर्जवाटपात आघाडी

परभणी : महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतर्फे परभणी जिल्ह्यातील सर्व शाखांमार्फत यंदाच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये खरीप आणि रब्बीचे मिळून एकूण २२ हजार ७७२ शेतकऱ्यांना १६८ कोटी ७ लाख ७४ हजार रुपये एवढे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. पीक कर्जवाटपात अन्य बॅंकांच्या तुलनेत महाराष्ट्र ग्रामीण बॅंक आघाडीवर आहे.

कर्जमाफी योजनेसाठी बॅंकेचे ३७ हजार ३०९ शेतकरी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील १४४ स्वंयसहाय्यता गटांना २ कोटी १४ लाख रुपये कर्जपुरवठा करण्यात आला आहे. तसेच जलसमृद्धी योजनेअंतर्गत ७ लाभार्थ्यांना १ कोटी १४ लाख ८५ हजार रुपये अर्थसाह्य करण्यात आले. यासंदर्भात महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे विभागीय व्यवस्थापक डी. डी. भिसे यांनी माहिती दिली.

२०१८-१९ या वर्षीच्या खरिपात महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २०० कोटी १४ लाख १२ हजार रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १९ हजार ९५४ शेतकऱ्यांना १४५ कोटी ६२ लाख ३६ हजार रुपये (७२.७६ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले. रब्बीमध्ये ३१ कोटी ८२ लाख १७ हजार रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात २ हजार ८१८ शेतकऱ्यांना २२ कोटी ४५ लाख ३८ हजार रुपये (७०.८६ टक्के) एवढे कर्जवाटप करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ ते १३ लिस्टअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे ३७ हजार ३०९ शेतकरी २२४ कोटी २६ लाख १० हजार ६८७ रुपयांच्या कर्जमाफीसाठी पात्र आहेत. यामध्ये २८ हजार ७४ शेतकऱ्यांना १७८ कोटी २५ लाख ७५ हजार ३२२ रुपयांची कर्जमाफी, एकवेळ समझौता योजनेअंतर्गत ७ हजार ९९६ शेतकऱ्यांना ४३ कोटी ८३ लाख ७३ हजार ७६६ रुपये, प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत १ हजार २३९ शेतकऱ्यांच्या २ कोटी १६ लाख ६१ हजार ५९८ रुपये रकमेचा समावेश आहे.

२०१७-१८ मध्ये ५७२ स्वंयसाह्यता गटांना ६ कोटी ७८ लाख १५ हजार रुपये आणि २०१८-१९ मध्ये १४४ स्वंयसाह्यता गटांना २ कोटी १४ लाख ३१ हजार रुपये कर्जपुरवठा करण्यात आला आहे. जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात एकूण ९ लाभार्थींना कर्जवाटप करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com