जळगाव जिल्हा बँकेत ‘महाविकास’ची सरशी

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अमळनेर तालुका विविध कार्यकारी सोसायटी गटातून प्रतिस्पर्धी उमेदवाराचे अपील विभागीय सहनिबंधकांनी देखील फेटाळल्याने संचालकपदी आमदार अनिल पाटील बिनविरोध झाले आहेत.
 lead of 'Mahavikas' in Jalgaon District Bank
lead of 'Mahavikas' in Jalgaon District Bank

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अमळनेर तालुका विविध कार्यकारी सोसायटी गटातून प्रतिस्पर्धी उमेदवाराचे अपील विभागीय सहनिबंधकांनी देखील फेटाळल्याने संचालकपदी आमदार अनिल पाटील बिनविरोध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून संपूर्ण जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच चोपडा तालुक्यात भाजपचे घनःश्याम अग्रवाल हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने चोपड्यातही भाजपकडे उमेदवार नसल्याची स्थिती आहे. बँकेत महाविकास आघाडीची सरशी झाल्याचे दिसत आहे.

अग्रवाल हे भाजपच्या केंद्रीय समितीतही मध्यंतरी कार्यरत होते. त्यांनी बँकेच्या निवडणुकीसाठी यापूर्वीच अर्ज दाखल केला होता. आता अग्रवाल हे भाजपमधून बाहेर पडल्याने त्यांचीही चोपडा सोसायटी मतदारसंघातून बँकेत निवड होईल, असे दिसत आहे. यामुळे गोकूळ पाटील (वढोदा) व इतर उमेदवारांना माघार घ्यावी लागेल, अशीही चर्चा आहे. 

या निमित्त आमदार पाटील यांनी बँकेत संचालकपदाची हॅटट्रिक पूर्ण केल्याने सहकार क्षेत्रात खरोखरच त्यांनी आपला दबदबा सिद्ध केला आहे. याचा परिणाम आगामी बाजार समितीच्या निवडणुकीवरही होण्याचे संकेत मिळत आहेत. या आधीच एक प्रबळ उमेदवार म्हणून आमदार पाटील यांच्याकडे पाहिले जात असताना सोसायटी गटातील प्रतिस्पर्धी उमेदवार माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह अन्य दोन उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्याने या गटात आता आमदार पाटील यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहून त्याच वेळी त्यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला होता. 

मात्र त्यानंतर अर्ज फेटाळले ़गेलेल्या भाजपच्या नऊ उमेदवारांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. त्यात स्मिता वाघ यांचाही समावेश होता. मात्र हे अपील विभागीय सहनिबंधकांनी फेटाळून लावल्याने आमदार पाटील बिनविरोध विजयी झालेत. 

भाजपची सत्ता अशक्य

भाजप बँकेत सत्ता मिळवेल, असे दिसत नाही. कारण अनेक मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तर उमेदवारच नसल्याने पारोळा, एरंडोल, धरणगाव व बोदवड येथील सोसायटी मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता भाजपच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने अमळनेर, मुक्ताईनगर येथे आघाडीचे अनिल पाटील, एकनाथ खडसे बिनविरोध निवडून आल्याचे निश्चित आहे. चोपड्यातही भाजपकडे सध्या उमेदवार नसल्याची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com