Agriculture news in marathi; Leading dryland in the eastern part of Sangli | Agrowon

सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाक

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

सांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार तालुक्‍यांत मुसळधार पाऊस बरसला. यामुळे तासगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील येरळा दुथडी वाहत असताना पूर्व भागातील अग्रणी मात्र अजूनही कोरडीठाक पडली आहे. परिणामी, आजही पूर्व भागातील अनेक गावांमध्ये शेती पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.

सांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार तालुक्‍यांत मुसळधार पाऊस बरसला. यामुळे तासगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील येरळा दुथडी वाहत असताना पूर्व भागातील अग्रणी मात्र अजूनही कोरडीठाक पडली आहे. परिणामी, आजही पूर्व भागातील अनेक गावांमध्ये शेती पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.

जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून अतिवृष्टी झाली. नद्या, नाले, ओढ्यातील पाणी पात्रा बाहेर आले. वारणा, कृष्णा नदीला महापूर आला. तसाच महापूर येरळा नदीला देखील आला. त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. वास्तविक पाहता गेल्या वर्षी याच भागात उलटे चित्र होते. येरळा नदीत ताकारीचे पाणी सोडावे, यासाठी आंदोलने करण्याची वेळ आली होती. या वर्षी त्याच नदीवरील पूल वाहतुकीस बंद ठेवण्याची वेळ आली. राजापूर, तुरचीकडे जाणारे रस्ते बंद झाले होते. आता येरळा नदी दुथडी वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पुढील वर्षभराची पाण्याची समस्या मिटली आहे.  

दरम्यान, तासगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात अग्रणी नदीचे पात्र मात्र कोरडेठाक दिसत आहे. ऑगस्ट महिनाअखेरीसही अग्रणी नदी आणि नदीवरील सिद्धेवाडी तलावही कोरडा पडला आहे. अग्रणी काठची आणि सिद्धेवाडी तलावाखालील हजारो एकर द्राक्षशेती आजही पाण्याअभावी संकटात आहे. मध्यंतरी सलग पडलेल्या पावसाने खरीप पिकाला काहीसे जीवदान मिळाले असले, तरी बागायती पिकाला मात्र त्याचा कोणताही फायदा झाले झालेला नाही. आजही परिसरातील विहिरी, कूपनलिका, बंधारे कोरडे आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी अद्याप वाढलेली नाही. पावसाअभावी याभागातील सावळज, अंजनी, डोंगरसोनी सिद्धेवाडी, दहिवडी, वडगाव या गावात शेती पाण्याची समस्या कायम आहे. 

तालुक्‍याचे झाले दोन भाग
तासगाव तालुक्‍यात वाहणाऱ्या येरळा आणि अग्रणी या नद्या जीवनदायिनी आहेत. येरळा बारमाही झाली मात्र अग्रणी काठच्या शेतकऱ्यांच्या नशिबात आजही दुष्काळाचं आहे. निसर्गाची किमया अशी की तालुक्‍याचे चक्क दोन भाग झाले आहेत. एकीकडे भरपूर पाणी तर दुसरीकडे पावसाळ्यातही पाण्याचे टॅंकर अशी स्थिती निर्माण झाली आहे.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...