बीड जिल्हा बँकेत आघाडीला पाच जागा

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणीत शेतकरी विकास आघाडीने पाच जागांवर विजय मिळविला.
बीड जिल्हा बँकेत आघाडीला पाच जागा Leading five seats in Beed District Bank
बीड जिल्हा बँकेत आघाडीला पाच जागा Leading five seats in Beed District Bank

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणीत शेतकरी विकास आघाडीने पाच जागांवर विजय मिळविला. तर, बहिष्कार टाकणाऱ्या भाजप व अलिप्त राहिलेल्या शिवसेनेनेही एकेक जागा मिळविली आहे. अपक्ष रिंगणात असलेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदींनीही मोठा विजय मिळविला.

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालकांच्या निवडीसाठी प्रक्रीया सुरु झाली. मात्र, सेवा सोसायटी मतदार संघाच्या ११ जागांची निवडणूक रद्द झाल्याने उर्वरित सात मतदारसंघातील आठ जागांसाठी शनिवारी मतदान झाले. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पुढाकाराने काँग्रेस, शिवसेनेची शेतकरी विकास आघाडी रिंगणात उतरली. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नेतृत्व केले. तर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी निवडणुकीची रणनीती आखली. 

पण, या आघाडीपासून शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांसह शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित देखील वेगळ्या चिन्हांवर रिंगणात होते. मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी निवडणूक प्रक्रियेचा निषेध म्हणून बहिष्कार अस्त्र उगारले. त्यामुळे शिवसेनेचा दुसरा गटही गर्भगळीत झाला आणि त्यांनीही अलिप्त म्हणत शस्त्र म्यान केले. त्यामुळे बदामराव पंडित यांचा मोठा पराभव झाला. दरम्यान, राष्ट्रवादी आघाडीने आठ पैकी पाच जागा मिळविल्या.

मतदार संघनिहाय विजयी उमेदवार

  •   इमाव : कल्याण आखाडे (शेतकरी विकास आघाडी)
  •   पणन व प्रक्रिया : भाऊसाहेब नाटकर (शेतकरी विकास आघाडी)
  •   नागरी बँक/पगारदार पतसंस्था : राजकिशोर मोदी (अपक्ष)
  •   इतर शेती संस्था : अमोल आंधळे (शेतकरी विकास आघाडी)
  •   अनुसूचित जाती/जमाती : रवींद्र दळवी (शेतकरी विकास आघाडी)
  •   विमुक्त जाती भटक्या जमाती : सूर्यभान मुंडे (शेतकरी विकास आघाडी)
  •   महिला राखीव : सुशीला पवार (भाजप) 
  •   कल्पना शेळके (शिवसेना)  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com