सातारा जिल्ह्यात खासगी कारखान्यांची ऊसगाळपात आघाडी

सातारा ः मागील ऊस गाळपात सहकारी कारखान्यांची आघाडीची मक्तेदारी खासगी कारखान्यांनी मोडून काढली आहे.
 Leading private factories in Satara district
Leading private factories in Satara district

सातारा ः मागील ऊस गाळपात सहकारी कारखान्यांची आघाडीची मक्तेदारी खासगी कारखान्यांनी मोडून काढली आहे. या हंगामात ३१ डिसेंबरअखेर खासगी कारखान्यांनी २१ लाख २३ हजार २०८ टन उसाचे गाळप केले आहे. साखर उताऱ्यात सह्याद्री कारखान्यांची आघाडी कायम आहे. 

जिल्ह्यात १६ साखर कारखाने असून यापैकी १४ कारखान्यांचे ऊस गाळप सुरू आहे. या १४ साखर कारखान्यांकडून ३१ डिसेंबरअखेर ३७ लाख ६३ हजार २८७ टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे ३८ लाख २६ हजार ७५७ क्विंटल साखर निर्मिती केली आहे. सध्या साखरेचा सरासरी उतारा १०.१७ टक्के मिळत आहे. सात खासगी कारखान्यांनी २० लाख सहा हजार ४४५ क्विंटल साखर उत्पादन घेतले. 

तो़डणी यंत्रणा विस्कळीत

मागील हंगामाच्या अखेरीस कोरोनामुळे ऊसतोड मजूरांना घरी जाताना अडचणींना सामोरे जावे लागले होते. याचा परिणाम या हंगामावरही दिसून आला आहे.

या हंगामात अपेक्षित ऊसतोड मजूर न आल्याने जिल्ह्यातील अनेक कारखान्यांची तोडणी यंत्रणा विस्कळीत झाली आहे. यामुळे काही कारखान्यांकडून सुरुवातीपासून ऊसतोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर केला जात आहे. मात्र शिल्लक उसाचे क्षेत्र व तोडणी यंत्रांचा विचार करता हंगाम लांबणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com