agriculture news in marathi, Leading from Sawalaj's `'Tembhu' deprived | Agrowon

सावळजमधील अग्रणी ‘टेंभू'पासून वंचित
टीम अॅग्रोवन
रविवार, 2 जून 2019

सांगली :  सावळजसह पूर्व भागात शेतीच्या पाण्याची टंचाई आहे. विसापूर - पुणदी व म्हैसाळ या योजना वारंवार बंद राहतात. योजनांपासून काही भाग वंचित राहत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांनाच लाभ होतो. पर्याय म्हणून खानापूर तालुक्‍यातील टेंभूच्या पाचव्या टप्प्याची उंची वाढवून सिद्धेवाडी तलावात पाणी टाकून अग्रणी बारमाही करण्याचे नियोजन केले आहे. अजून एकदाही सावळज परिसरातील अग्रणीत 'टेंभू'चे पाणी न आल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. 

सांगली :  सावळजसह पूर्व भागात शेतीच्या पाण्याची टंचाई आहे. विसापूर - पुणदी व म्हैसाळ या योजना वारंवार बंद राहतात. योजनांपासून काही भाग वंचित राहत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांनाच लाभ होतो. पर्याय म्हणून खानापूर तालुक्‍यातील टेंभूच्या पाचव्या टप्प्याची उंची वाढवून सिद्धेवाडी तलावात पाणी टाकून अग्रणी बारमाही करण्याचे नियोजन केले आहे. अजून एकदाही सावळज परिसरातील अग्रणीत 'टेंभू'चे पाणी न आल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. 

टेंभू उपसा योजनेतून अग्रणी नदी बारमाही करण्याचा निर्णय गेल्या तीन वर्षापूर्वी झाला. त्यानुसार पाटबंधारे विभागाने काम देखील सुरु केले. तासगाव पूर्व भागात द्राक्ष शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. गेल्यावर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे या भागातील तलाव कोरडे होते. टेंभू उपसा सिंचन योजनेतून तलाव भरणे अपेक्षित होते. मात्र, तसे केले नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ''टेंभू''चा पाचव्या टप्प्यातून प्रायोगिक तत्त्वावर चाचणीसाठी अग्रणीत पाणी सोडण्यात आले. ते सिद्धेवाडी तलावात पोचल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. परंतु, ते पाणी सावळज परिसरातील अग्रणीत न आल्याने अग्रणीसह, काठावरील द्राक्षशेती पाण्यापासून वंचित राहिली.

नदीकाठावरील १०० हून अधिक हेक्‍टर द्राक्षपीक संकटात आहे. उन्हाळ्यात बागांना पाण्याची गरज भासते. शेतकरी टॅंकरने पाणी विकत घेत आहेत. 

इतर बातम्या
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील सात...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४६...
कापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...
पहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव  ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...
पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...