नेर तलावातून गळती

विसापूर, जि. सातारा : सद्य:स्थितीत नेर तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सांडव्याला तीन ते चार ठिकाणी पडलेल्या भगदाडांमुळे तलावास धोकाही निर्माण झाला आहे.
Leak from Ner Lake
Leak from Ner Lake

विसापूर, जि. सातारा : खटाव तालुक्‍याला वरदान ठरलेला नेर तलाव यंदा सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधारेने पूर्ण क्षमतेने भरून वाहिला. तलावात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध झाला. मात्र सद्य:स्थितीत तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सांडव्याला तीन ते चार ठिकाणी पडलेल्या भगदाडांमुळे तलावास धोकाही निर्माण झाला आहे. काही कमी-जास्त घडले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. 

ब्रिटिशकालीन नेर तलावात सुमारे ६७७ एकर जमीन गेली आहे. तलावाची पाणी साठवण क्षमता पाच हजार २३० लक्ष घनफूट आहे. गाळाच्या संचयनाने सद्य:स्थितीत ती चार हजार १६० लक्ष घनफूट इतकी झाली आहे. या तलावावरती परिसरातील २२ गावांच्या पाणीपुरवठा योजना तसेच तालुक्‍यातील दोन हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र अवलंबून आहे.

सद्य:स्थितीत तलाव पूर्ण क्षमतेने भरूनदेखील सुरू असलेल्या गळतीमुळे तलावामधील पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. पाणीपातळी कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात दुष्काळजन्य परिस्थिती उद्‌भवली तर तलावाच्या पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या शेतकरी तसेच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. तलावातून होणारी गळती दरवर्षी वाढतच चालल्याने मोठी हानीदेखील होण्याची शक्‍यता आहे. 

तलावाच्या संरक्षक भिंतीला पडलेल्या भगदाडांमुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास पाणी वाया जाऊन भविष्यात शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तलावाच्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती वेळेत करावी.  - सचिन पवार, प्रगतिशील शेतकरी, नेर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com