नवनवीन शेती तंत्रज्ञानाची माहिती घ्या : पालकमंत्री खोतकर

नवनवीन शेती तंत्रज्ञानाची माहिती घ्या : पालकमंत्री खोतकर
नवनवीन शेती तंत्रज्ञानाची माहिती घ्या : पालकमंत्री खोतकर

उस्मानाबाद : ‘‘शेतकऱ्यांनी शेती व शेती तंत्रज्ञानाबाबत नवनवीन माहिती मिळवावी. त्याद्वारे परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करावा,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व प्रकल्प संचालकतर्फे (आत्मा) २ ते ५ जून या कालावधीत कृषी प्रदर्शन, महोत्सवाचे आयोजन नगर परिषद नाट्य सभागृह, यशराज लॉन्स येथे करण्यात आले. यामधील परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी खोतकर बोलत होते. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, शंकरराव बोरकर, संजय पाटील दुधगावकर, कैलास पाटील, जिल्हा परिषद सदस्य साळवी, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे, प्रकल्प संचालक (आत्मा) जितेंद्र शिंदे, कृषी उपसंचालक सुभाष चोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पसरटे, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) केशव मलगुंडे, प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी सत्यवान सुरवसे उपस्थित होते. 

खोतकर म्हणाले, ‘‘आपल्या जीवनाची दिशा आपणच ठरवावी. नकारात्मक विचारांना थारा न देता संशोधनात्मक वृत्ती जोपासावी. शेती नियोजन करताना सर्वच गोष्टींचे काटेकोर नियोजन आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांनी पर्यावरणाचा अंदाज घेऊन पिकांच्या लागवडीचे नियोजन करावे.’’

मुधोळ-मुंडे म्हणाल्या, ‘‘शेतकऱ्यांनी शेती, पाणी वापराचे नियोजनाचा अभ्यास करावा. मागासलेल्या जिल्ह्याचे आहोत, या वाक्‍याचा आणि विचारांचा त्याग करा.’’

प्रगतिशील शेतकरी सत्यवान सुरवसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पाणी, मजूर, शेतीमालाच्या विक्रीचे नियोजन या विषयीचे अनुभव सांगितले. चौगुले यांनीही उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. डॉ. पसरटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना या परिसंवादाचे महत्त्व, त्यातील विषय व संबंधित वक्ते या विषयांची सविस्तर माहिती दिली. घाटगे यांनी प्रास्ताविक केले. चोले यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com