agriculture news in marathi At least 25% on agricultural products Process and sell | Agrowon

किमान २५ टक्के शेतीमालावर प्रक्रिया करून विक्री करा

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

जालना : ‘‘उत्पादित केलेल्या किमान २५ टक्के शेतमालावर प्रक्रिया करून त्याची विक्री करा,’’ असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर यांनी दिला.

जालना : ‘‘उत्पादित केलेल्या किमान २५ टक्के शेतमालावर प्रक्रिया करून त्याची विक्री करा,’’ असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर यांनी दिला.  
कृषी विज्ञान केंद्र, खरपुडीच्या वतीने आयोजित ऑनलाइन कृषी तंत्रज्ञान महोत्सवात शुक्रवारी (ता. २५) प्रथम तांत्रिक सत्रामध्ये डॉ. क्षीरसागर मार्गदर्शन करीत होते. या तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त भगवानराव काळे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्रीकृष्ण सोनुने हेही उपस्थित होते.

‘बदलत्या हवामानात मोसंबी व्यवस्थापन’ यावर फळ संशोधन केंद्र, औरंगाबाद येथील प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. 

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘मोसंबी पिकाचे व्यवस्थापन करताना आपल्या पिकामध्ये सेंद्रिय कर्बाचे योग्य प्रमाण राखण्यासाठी सेंद्रिय पदार्थाचा वापर करावा. आंतरपीक घेऊन जमिनीचा पोत सुधारावा. बगीचा दीर्घकाळ राखण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी एकाच बहराचे नियोजन करावे. लागवडीपासून योग्य प्रमाणात खत मात्रा देऊन झाडाची योग्य वाढ करावी, जेणेकरून बगीचा दीर्घकाळ टिकू शकेल व भरपूर उत्पन्न मिळेल.’’

शिंदे म्हणाले, ‘‘गेल्या दोन वर्षात मोसंबी लागवड ही मोठ्या प्रमाणात जालना जिल्ह्यात वाढली आहे.’’ डॉ. पाटील यांचे असेच मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत राहावे.’’ 

डॉ. क्षीरसागर म्हणाले, ‘‘ग्रामीण रोजगाराच्या संधीचा विचार करता आपल्याच शेतात व परिसरात उत्पादित कच्च्या कृषी मालाचा विचार करून त्यावर आपण कमी आर्थिक भांडवलात व्यवसाय सुरू करू शकतो. या साठी सहज सोपे तंत्रज्ञान हे विद्यापीठात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा.’’

‘‘मोसंबी व्यवस्थापन व ग्रामीण रोजगरातील युवकांच्या संधी, हे विषय सध्या अतिशय महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांना हे मार्गदर्शन मोलाचे ठरेल,’’ असे काळे यांनी केले. या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शेतकरी ऑनलाइन उपस्थित होते. विषय विशेषज्ञ अजय मिटकरी यांनी आभार मानले.


इतर ताज्या घडामोडी
नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा...नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू...
व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची...नगर ः व्हर्च्युअल क्लासरूम आणि अॅग्री-दीक्षा वेब...
‘एमआरपी’नुसारच खतांची खरेदी करावी सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर...
खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज...अकोला : अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ११४०...
सटाणा बाजार समिती आवाराबाहेर अवैध...नाशिक : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही...
नाशिक जिल्ह्यात विहिरींनी गाठला तळ नाशिक : जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये अनेक भागांत...
भोकरखेडात चार वर्षांपासून शेतकरी वीज...वाशीम : शेतात वीज जोडणी घेऊन सिंचन करता येईल....
टेंभू योजनेचे पाणी सोडले; ‘बंदिस्त पाइप...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात टेंभू...
प्रत्येक गावाचा होणार कृषी विस्तार...जालना : कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे...
तमाशा कलावंतांसाठी सरसावले मदतीचे हात नगर ः : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे टाळेबंदी...
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा...
कांदा बाजारावर ‘कोरोना’चा परिणाम नगर : कोरोना व्हायरसची बाधा वाढत असल्याचा बाजार...
महाराष्ट्राला रेमडिसिव्हिर देण्यास ‘...मुंबई : केंद्र सरकारकडून रेमडिसिव्हिर निर्यातीवर...
डाळिंब सल्लाहस्त बहर उशिरा घेतला असेल तर फळांना बटर पेपर बॅग...
कृषी सल्ला : आंबा, काजू, नारळ, सुपारीनवीन आंबा लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील...
कृषी सल्ला : सुरु ऊस, कांदा, फळपिकेवातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या...
राज्यात उष्ण, ढगाळ हवामानसोमवार ते बुधवारपर्यंत (ता.१९ ते २१) १००८...
नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वसंत...नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
देशात ‘जमीन सुपोषन व संरक्षण जनजागरण’...औरंगाबाद : संपूर्ण देशभरात मंगळवारपासून (ता. १३...
निराधार महिला शेतकऱ्यांसाठी ‘ट्रँक्टर...अमरावती : अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निराधार,...