नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठा

धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठा
धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठा

नाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील साठे कमी होत आहेत. दुष्काळामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना धरणसाठ्यातही कमालीची घट होत आहे. सद्यःस्थितीत धरणांमध्ये फक्त ४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आगामी काळात दुष्काळाचे चटके आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. उपलब्ध पाणीसाठ्यावर पुढील सहा महिने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

जिल्ह्यात ८३ टक्के इतकाच पाऊस नोंदला गेला. कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. येवला, नांदगाव, बागलाण या तालुक्यांत अत्यल्प पाऊस झाला. दिवाळीनंतरच जिल्ह्यामध्ये काही भागात पाणीटंचाईला समोरे जावे लागले. सध्या अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. नदी, नाले कोरडे पडले आहेत. अनेक गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला आहे.

सद्यःस्थितीत ३५० गावे, वाड्यांना १११ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आगामी काळात जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी वाढणार आहे. धरणांमधून आवर्तने सोडावी लागतील. आगामी काळात दुष्काळाची दाहकता आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत. मार्च ते जून या कालावधीत जिल्ह्यात ‘पाणीबाणी’ निर्माण होण्याची शक्यता आहे. 

विभागाची परिस्थितीही जेमतेम 

नाशिक विभागातील जलसाठ्याच्या उपलब्धतेवरही परिणाम झाला आहे. विभागीय महसूल कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी २०१९ अखेरपर्यंत नाशिक जिल्ह्यात ४५. ३३ टक्के, जळगाव- ३६.१५ टक्के, धुळे -  ३८.३२ टक्के, नंदूरबार-५१.०५ टक्के, तर अहमदनगर जिल्ह्यात केवळ ३२.१८ टक्के जलसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणातील जलसाठा (टक्के)  

गंगापूर -४९, पालखेड -३४, करंजवण -५२, वाघाड -३५, ओझरखेड -५२, पुणेगाव -४३, तिसगाव -३९, वालदेवी - ६८, भोजापूर -१४, गिरणा -३१, नांदूरमधमेश्वर -१५, चणकापूर -७८, हरणबारी -५७, केळझर ४८, पुणद -८५, माणिकपूंज -१२, भाम धरण : ०० (केवळ मृतसाठा),  भावली धरण :१२, कडवा धरण : २३, मुकणे धरण : ३९, वाकीखापरी धरण : ४१, दारणा धरण : ४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com