Agriculture news in marathi At least seven thousand rupees for cotton in Parbhani district | Page 3 ||| Agrowon

परभणी जिल्ह्यात कापसाला किमान सात हजार रुपये दर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील खासगी कापूस खरेदीस सुरु झाली आहे. मानवत येथे अनेक जिनिंग उद्योजकांनी कापूस खरेदी सुरु केली आहे. सध्या दररोज सरासरी ७०० ते ८०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. दर्जानुसार किमान ७ हजार रुपये दराने खरेदी केली जात आहे. 

परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील खासगी कापूस खरेदीस सुरु झाली आहे. मानवत येथे अनेक जिनिंग उद्योजकांनी कापूस खरेदी सुरु केली आहे. सध्या दररोज सरासरी ७०० ते ८०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. दर्जानुसार किमान ७ हजार रुपये दराने खरेदी केली जात आहे. 

जिल्ह्यात यंदा १ लाख ८१ हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे पाणी साचून राहिल्याने अनेक मंडलातील कपाशीची बोंडसड झाली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. ऑक्टोबर हिटमुळे बोंडे फुटली आहेत. परंतु सोयाबीन काढणीच्या कामांमुळे मजुर मिळत नसल्यामुळे कापूस वेचणीची कामे रखडली आहेत. 

मजुर उपलब्ध झाल्यामुळे परभणी, सेलू, मानवत तसेच अन्य तालुक्यात कापूस वेचणी सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांचा कपाशीचा एकाच वेचणीमध्ये झाडा झाला आहे. आर्थिक गरजांसाठी गेल्या काही दिवसांपासून शेतकरी विविध ठिकाणच्या बाजार पेठांमध्ये कापूस विक्रीसाठी नेत आहेत. मानवत येथील जिनिंग सात ते आठ जिनिंगमध्ये खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरु केली आहे. बुधवारी (ता.२०) कापसाच्या प्रतीनुसार प्रतिक्विंटल ७ हजार ते ७ हजार ४०० रुपये दर मिळाले.

काही जिनिंग उद्योजकांनी खरेदी केलेल्या कापसावर प्रक्रिया करून रुईच्या गाठी निर्मिती सुरु केली आहे. परंतु खेड्यापाड्यातून पाच ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने किरकोळ खरेदी केली जात आहे. खुल्या बाजारात कापसाचे दर आधारभूत किंमतीपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत कापूस खरेदी तूर्त सुरु होण्याची शक्यता नाही. गाठी शिल्लक नसल्यामुळे खुल्या बाजारातील दर वधारण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
 


इतर बातम्या
माण तालुक्यात द्राक्ष शेतीचे पावसामुळे...कुकुडवाड, जि. सातारा : मागील आठवड्यात सलग आठवडाभर...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
‘इटियाडोह’च्या पाण्यासाठी बेमुदत...गोंदिया ः रब्बीत २४ किलोमीटरपर्यंत इटियाडोह...
काटेपूर्णा प्रकल्पावरून रब्बीसाठी पाणी...अकोला ः जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पातून या...
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगाम धोक्यातनांदेड : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून सतत...
हर्षवर्धन पाटलांच्या धरणे आंदोलनाची...इंदापूर, जि. पुणे ः भाजप नेते हर्षवर्धन पाटील...
पुणे बाजार समितीत ‘डमी’ अडत्यांचा...पुणे ः बाजार समितीच्या मुळ उद्देशालाच हरताळ...
नगरमध्ये कोथिंबीर, मेथीची आवक वाढलीनगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
शासन व ग्रामपंचायतीच्या समन्वयातून...नाशिक: ग्रामीण भागात विविध योजना व संकल्पनांची...
ई- पीकपाहणीत जळगाव अव्वल ! जळगाव : राज्यातील पहिल्याच ई- पीकपाहणी प्रकल्पाचा...
कव्हेतील डाळिंब बागेची सोलापूर डाळिंब... सोलापूर ः माढा तालुक्यातील कव्हे (ता.माढा)...
 खानदेशात रब्बीची ४० टक्के पेरणी जळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ...सोलापूर ः राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२१ ते...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र...पुणे ः कृषी योजनांसाठी दिलेल्या निधीचा उपयोग...
 पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला...
कांडली ग्रामपंचायतीची सौरऊर्जेतून...अमरावती ः अचलपूर पंचायत समितीअंतर्गत कांडली...