agriculture news in Marathi leave agitation of employees of agriculture university Maharashtra | Agrowon

कृषी विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांचे रजा आंदोलन

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

सातवा वेतन आयोग लागू करावा, तसेच दहा, वीस, तीस वर्षानंतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा यांसह इतर मागण्यांसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. 

नगर ः कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा,  तसेच दहा, वीस, तीस वर्षानंतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा यांसह इतर मागण्यांसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. शुक्रवारी (ता.६) आंदोलनाचा तिसरा टप्पा होता. 

आंदोलनात राज्यभरातील चारही विद्यापीठातील सुमारे साडेसात हजारापेक्षा अधिक कर्मचारी आणि सामूहिक रजा आंदोलन केले आजच्या आंदोलनात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सहभागी झाले होते. सोमवारपासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन आणि धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती विद्यापीठांतून देण्यात आली.

सर्व विद्यापीठांतील मुख्यालयात येऊन कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत त्या-त्या विभागातील कुलसचिव यांना मागण्याचे निवेदन दिले. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या आंदोलनांमध्ये गो संशोधन प्रकल्प शेळी संशोधन प्रकल्प, मेंढी संशोधन प्रकल्प सुरक्षा सेवा, वैद्यकीय सेवा, पाणी व्यवस्था आदी अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. मात्र शुक्रवारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ही राजा आंदोलनात सहभागी झाले. शुक्रवारी आंदोलनाचा ११ वा दिवस होता.
 


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...