सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा उद्रेक

निर्यातबंदीमुळे सीमांवर अन् बंदरावर कांदा अडकल्याने व्यापारी अडचणीत आले. परिणामी हा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे केंद्राने प्राधान्याने अडकलेले ४०० हुन अधिक कंटेनर अन् ७०० हुन ट्रक्स पाठविण्यात यावेत. अन्यथा पुढील टप्प्यात उद्रेक होईल, असा इशारासदाभाऊ खोत यांनी दिला.
Leave the onion in the border and port; Otherwise outbreaks
Leave the onion in the border and port; Otherwise outbreaks

नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील देशांकडून कांद्याची मागणी वाढू लागल्याने शेतकरी अन् व्यापारी यांच्या कामात थोडी सुसूत्रता आली. त्यामुळे मागणी नोंदवून घेत निर्यातदारांनी कांदा बाहेर पाठविण्याची तयारी केली. मात्र, केंद्राने पूर्वसूचना न देता निर्यातबंदी केली. त्यामुळे सीमांवर अन् बंदरावर कांदा अडकल्याने व्यापारी अडचणीत आले. परिणामी हा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.त्यामुळे केंद्राने प्राधान्याने अडकलेले ४०० हुन अधिक कंटेनर अन् ७०० हुन ट्रक्स पाठविण्यात यावेत. अन्यथा पुढील टप्प्यात उद्रेक होईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केंद्राला दिला.

कांदा निर्यातबंदीच्या मुद्द्यावर आक्रमक होऊन रयत क्रांती संघटनेने विंचूर (ता. निफाड) बाजार समिती उपबाजार आवरासमोर नाशिक-औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको केला. त्यावेळी पोलिसांनी सुरुवातीला मज्जाव करत आंदोलन करण्यापासून रोखले. यावेळी श्री. खोत हे आंदोलन करत असताना पोलिसांशी बाचाबाची झाली.

राज्यातील खासदारांनी याबाबत सरकारला जाब विचारला नाही तर त्यांच्या घरासमोर २३ सप्टेंबरला आंदोलन करणार असा इशाराही श्री. खोत यांनी दिला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष वाल्मिक सांगळे, प्रांतिक सदस्य दीपक पगार, महिला आघाडी अध्यक्षा ज्योती निरगुडे यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व कांदा उत्पादक उपस्थित होते.

कांद्याला प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदान द्या खरेदीवर व दरावर परिणाम होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले असून शेतकऱ्यांमध्ये भेटलो असता असंतोष आहे.त्यांची अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने टाळे बंदीत विकला गेला, त्या विक्रीची बाजार सरकारकडे नोंद आहे. त्या कांद्याला १ हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी श्री. खोत यांनी राज्य सरकारकडे केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com