agriculture news in marathi Leave the rotation on the banks of Waghur river, demand of farmers | Agrowon

वाघूर नदीकाठी पाटचारीत आवर्तन सोडा,शेतकऱ्यांची मागणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

जळगाव  ः वाघूर नदीकाठी व शिवारातील टंचाई लक्षात घेता नदी व शक्‍य त्या भागातील पाटचारीत पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

जळगाव  ः वाघूर नदीकाठी व शिवारातील टंचाई लक्षात घेता नदी व शक्‍य त्या भागातील पाटचारीत पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

वाघूर प्रकल्पाचा लाभ भुसावळ, जळगाव व जामनेर तालुक्‍याला होतो. पाटचारी जळगाव तालुक्‍यातील कोरडवाहू पट्ट्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आसोदा, भादली व लगत काळी कसदार जमीन आहे. या भागात पूर्वहंगामी कापसाची लागवड होवू शकते. त्यासाठी पाटचारीत नियोजनबद्धरित्या पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. तर, भुसावळ तालुक्‍यातील कुऱ्हे पानाचे, वराडसीम, गोजोरा भागातही पाण्याची प्रतीक्षा आहे. 

या भागात हलकी, मुरमाड जमीन आहे. वाघूर नदीतदेखील पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. या नदीचे पाणी साकेगाव (ता.भुसावळ) जवळ तापी नदीत जावून मिळते. या पाण्याचा उपयोग पुढे जळगाव, यावल तालुक्‍यातील नदीकाठच्या गावांना होवू शकतो. वाघूरमधून खरिपासाठी पाण्यासंबंधी पाटबंधारे विभागाने कार्यवाही हाती घेतली आहे. पाणी मागणीबाबत अर्जही मागविले होते. परंतु, पाणी पुढील आठवड्यात सोडले जाईल, अशी माहिती मिळाली. 


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...