उसाची बाकी द्या, अन्यथा स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर धरणे

नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे गेल्या वर्षीच्या उसाची प्रतिटन ५०० रुपये अधिक विलंब व्याज एवढी बाकी शिल्लक आहे. ती येत्या १४ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.
 Leave the sugarcane, otherwise hold it in front of the Guardian's house on Independence Day
Leave the sugarcane, otherwise hold it in front of the Guardian's house on Independence Day

नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे गेल्या वर्षीच्या उसाची प्रतिटन ५०० रुपये अधिक विलंब व्याज एवढी बाकी शिल्लक आहे. ती येत्या १४ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. अन्यथा, भोकर मतदार संघातील सरपंचांना सोबत घेऊन १५ ऑगस्ट रोजी घरासमोर एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंचांसह शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांना दिला. 

ऊस गाळपाला गेल्यानंतर चौदा दिवसांत शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी मिळणे बंधनकारक आहे. तरीही भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यांने मागील हंगामात केवळ २००० च्या आसपास रक्कम शेतकऱ्यांना दिली. अजूनही प्रतिटन ५०० रुपये तसेच त्यावरील विलंब व्याज कारखान्याकडे बाकी आहे. कोरोनामुळे सर्वाधिक आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. 

पेरणीवेळी कारखान्याकडून थकित रक्कम मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. येत्या १४ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना गतवर्षीच्या उसाची एफआरपीची रक्कम द्यावी, अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इंगोले, अर्धापूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सरपंच भगवान कदम (देगाव) आदीसह अनेक गावांतील सरपंचांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com