पुणे बाजार समितीच्या निवडणुकीची सोमवारी आरक्षण सोडत

Leaving reservation for election of Pune Bazar Committee on Monday
Leaving reservation for election of Pune Bazar Committee on Monday

पुणे ः गेल्या १६ वर्षांपासून बहुप्रतीक्षित असणाऱ्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठीच्या गणनिहाय आरक्षणाची सोडत सोमवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी तीन वाजता काढण्यात येणार आहे. ही निवडणूक शेतकऱ्यांना थेट मतदानाचा हक्क देणारी असली, तरी भाजपच्या या निर्णयाला विधानसभा अधिवेशनात स्थगिती दिली असून, बाजार समित्यांच्या निवडणुका पुन्हा बाजार समिती घटकांतील मतदानानुसार होणार असल्याचे संकेत आहेत. यामुळे १६ वर्षांनंतरही ही निवडणूक होणार का, याबाबत बाजार घटक साशंक आहेत.  

पुणे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी अंतिम करण्याची प्रक्रियादेखील सुरू आहे. यासाठी गणनिहाय सोडत काढली जाणार असून, गणांमध्ये २ महिलांसाठी, इतर मागासवर्ग १, विमुक्त आणि भटक्या जाती १, अनुसूचित जाती आणि जमाती १ अशा एकूण पाच गणांसाठी सोडत काढली जाणार  आहे. या सोडतीसाठी राजकीय लोक प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

निवडणूक प्रक्रियेबाबत साशंक बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये मागील सरकारने बदल केला होता. मात्र, आता महाविकास आघाडीने हा बदल रद्द करण्याचे संकेत दिले आहे. या सरकारने बाजार समितीवरील तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्‍यादेखील रद्द केल्या आहेत. त्यामुळे पुणे बाजार समितीची निवडणूक नव्या बदलांनुसार होणार, की पुन्हा रद्द होणार याबाबत बाजार घटक साशंक आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com