तेलकट डाग नियंत्रणासाठी बागेची स्वच्छता हवी

Dr. jostna sharma
Dr. jostna sharma

सोलापूर : डाळिंबावरील तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी हुकमी असे कोणते जीवाणूनाशक उपलब्ध नाही. त्याचे प्रमाण कमी करणे एवढेच उपचार सद्यःस्थितीत आपण करू शकतो. शक्‍यतो हस्त बहार घ्यावा आणि बागेच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असा सल्ला राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी दिला.  

अॅग्रोवनच्या वतीने आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनात आयोजित ‘डाळिंबावरील कीड-रोग नियंत्रण’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. शर्मा बोलत होत्या.

डॉ. शर्मा म्हणाल्या, की डाळिंबावरील वाणावर संशोधन आम्ही करतो आहोत. आतापर्यंत शेकडो वाणांचे प्रयोग आम्ही केले. आजही आमच्याकडे वेगवेगळी ३२५ वाणे आहेत. पण त्यापैकी काही रंगाला, काही चवीला, काही दर्जाला भिन्न प्रकारची आहेत. कोणतेही सगळे व्यावसायिक गुणधर्म एकाच डाळिंब वाणात नाहीत, त्यामुळे अडचणी येत आहेत. पण सध्याचे भगवा डाळिंब हे व्यावसायिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. मार्केटच्या मागणीनुसार त्याची गरज आणि विक्री वाढते आहे. पण त्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हायला हवे. कीड-रोगावर नियंत्रण मिळवल्यास त्याचे उत्पादन चांगले मिळू शकते.

डाळिंबामध्ये जैविक पद्धतीच्या खतांच्या मात्रा चांगल्या लागू पडल्या आहेत. त्यामुळे झाडांतील प्रतिकारक्षमता वाढली आहे. जैविक  घटकांच्या वापरामुळे मरसारख्या रोगाशीही लढणे शक्य झाल्याचे  आढळले आहे. पण तेलकट डाग रोगाच्या नियंत्रणासाठी गुणवत्तापूर्ण  आणि दर्जेदार रोपवाटिकेतून वाण आणून लागवड करणे, बहाराचे योग्य नियोजन आणि बागेची स्वच्छता महत्त्वाची आहे. ऑक्‍टोबरनंतर ‘हीट’ काहीशी कमी झालेली असते आणि आर्द्रता वाढलेली असते. पण हा काळ चांगला असतो, त्यामुळे या कालावधीत बागेचा बहार महत्त्वाचा ठरू शकतो. साधारणपणे फेब्रुवारीमध्ये बागेची काढणी झाली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com