agriculture news in marathi, legislative assembly session end , mumbai, maharashtra | Agrowon

जनतेची निराशा करणारे विधीमंडळ अधिवेशन ः धनंजय मुंडे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जुलै 2019

मुंबई : साडेचार वर्षांतील १४ अधिवेशनांप्रमाणेच शेवटच्या अधिवेशनातही सरकार जनतेच्या आशा, आकांक्षा पूर्ण करू न शकल्याने हे अधिवेशनही मुंबईत कोसळणाऱ्या पावसामध्ये वाहून गेले आणि जनतेची निराशा करणारे ठरले अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (ता. २) व्यक्त केली. 

मुंबई : साडेचार वर्षांतील १४ अधिवेशनांप्रमाणेच शेवटच्या अधिवेशनातही सरकार जनतेच्या आशा, आकांक्षा पूर्ण करू न शकल्याने हे अधिवेशनही मुंबईत कोसळणाऱ्या पावसामध्ये वाहून गेले आणि जनतेची निराशा करणारे ठरले अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (ता. २) व्यक्त केली. 

पावसाळी अधिवेशनाच्या समारोपानंतर अधिवेशनातील कामकाजासंबंधी बोलताना श्री. मुंडे म्हणाले, की राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरसकट कर्जमाफी, पीक विमा, दुष्काळी मदत, मागील काळातील जाहीर केलेली अनुदाने, पेरणीसाठीची मदत यापैकी कोणतीही गोष्ट शेतकऱ्यांच्या हाती या अधिवेशनाच्या माध्यमातून मिळू शकली नाही. कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही हे आम्ही पुराव्यानिशी अधिवेशनात सिद्ध केले. मात्र सरकारने त्यावरही कारवाई केली नाही. उलट न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यालाच तुरुंगात डांबण्याचे काम केले. शेवटच्या शेतकऱ्याला न्याय आणि सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. 

सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’मधील भ्रष्टाचार उघड केला हे या अधिवेशनातील सर्वांत मोठे यश आहे. ‘जलयुक्त’मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सबळ पुरावे दिल्याने सरकारला ते मान्य करावे लागले. एसीबी चौकशीचे आदेश द्यावे लागले. ८ ते १० हजार कोटी रुपयांचा हा झोलयुक्त भ्रष्टाचार असल्याने उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत या भ्रष्टाचाराची चौकशी करावी ही आमची मागणी कायम राहणार असल्याचे ते म्हणाले.

पात्र शेतकऱ्यांनाही कंपन्यानी पीकविम्याचा लाभ न देता मागील ३ वर्षांपासून पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची ८ ते १० हजार कोटींची लूट केली आहे. तालुका स्तरावर शेतकरी, प्रशासकीय अधिकारी आणि पीकविमा कंपनीचे अधिकारी यांची तक्रार निवारण समिती स्थापन करावी ही आमची मागणी असून, त्याबाबत सरकारने आणि निवडणुकीआधी पोपटासारखे बोलणाऱ्या शिवसेनेनेही मौन पाळले.

अधिवेशनाकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. परंतु सरकार पुन्हा एकदा त्यात कमी पडले असून, सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली असल्याने आगामी निवडणुकीत जनता त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास श्री. मुंडे यांनी व्यक्त केला.


इतर ताज्या घडामोडी
कृषिमंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यातच पीक...नाशिक : मूग नक्षत्राच्या तोंडावर पेरणीयोग्य पाऊस...
मराठवाड्यात बॅंकांकडून शेतकऱ्यांची...औरंगाबाद : मराठवाड्यात पूर्वमोसमी पाऊस बऱ्यापैकी...
सोलापूर जिल्ह्यात पीक कर्जवाटप अवघ्या...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
परभणी जिल्ह्यातील शिल्लक कापसाची...परभणी : शासकीय खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी...
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत ३६५ टॅंकर...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड,...
जैविक किटकनाशकांद्वारे पर्यावरणाचे...परभणी : ‘‘शेतीत रासायनिक किटकनाशकांचा वापर मोठ्या...
निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना तातडीने मदत...पुणे  ः निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या...
वऱ्हाडात २५ टक्क्यांपेक्षाही कमी...अकोला  ः जून महिना सुरु झाला असून वऱ्हाडातील...
पर्यावरणातील बदलांकडे लक्ष देऊन शेती...औरंगाबाद : ‘‘पर्यावरणातील सततच्या बदलाने आपल्या...
पीक कर्जासाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः कर्जमाफीच्या गोंधळामुळे...
सातारा जिल्हा बॅंकेकडून कर्ज व्याजदरात...सातारा  : `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु...
नगर जिल्ह्यात पीककर्ज वाटपात...नगर  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज पुरवठ्याकडे...
सांगली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची गती...सांगली  : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
रत्नागिरी जिल्हा बॅंकेकडून सव्वा पाच...रत्नागिरी  ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात...
कोल्हापूर जिल्ह्यात ६६ टक्के पीककर्ज...कोल्हापूर : जिल्ह्यात खरिपासाठी मे अखेरपर्यंत ६६...
नागपूर जिल्ह्यात १३ टक्के पीककर्ज वितरितनागपूर  ः माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी...
यवतमाळमध्ये खरिपासाठी २४.५१ टक्केच...यवतमाळ  ः शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा अशी ओळख...
उत्तर भारताच्या दिशेने मॉन्सून वेगाने...महाराष्ट्रावर उत्तरेस १००४ तर मध्यावर व दक्षिणेस...
चंद्रपूर जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...चंद्रपूर  ः चंद्रपूर जिल्ह्यातील बॅंका खरीप...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १८०० ते २०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...