बळिराजाचे हात बळकट  करण्यास पुन्हा येईन ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तेराव्या विधानसभेत पाच वर्षांत दररोजचे कामकाज तास सात
तेराव्या विधानसभेत पाच वर्षांत दररोजचे कामकाज तास सात

मुंबई : ''मी पुन्हा येईन, याच निर्धाराने याच भूमिकेत, बळिराजाचे हात बळकट करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्धारासाठी'' अशा काव्यपंक्ती ऐकवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. २) विधानसभेत २०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राची सूत्रे हाती घेणार असल्याचा आशावाद बोलून दाखवला.

विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना श्री. फडणवीस यांनी समारोपाचे भाषण केले. या वेळी त्यांनी गेल्या पाच वर्षांतील कामांची उजळणी केली.  या वेळी श्री. फडणवीस म्हणाले, की मुख्यमंत्री म्हणून काम करताना गेल्या पाच वर्षांच्या काळात अनेक अडचणी आल्या, आव्हाने निर्माण झाली, पण त्यापासून पळ काढला नाही. सर्वांना सोबत घेऊन प्रमाणिकपणे आणि सकारात्मकतेने प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. गेल्या १५ ते २० वर्षांत ज्या गोष्टी झाल्या नाहीत, त्या करून दाखविल्या. महाराष्ट्राचे वैभव परत आणण्यात यशस्वी ठरलो, असा दावाही फडणवीस यांनी केला. जनतेने आणि पक्षाने मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी दिली ती प्रमाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. कोणतेही प्रश्न असतील, आव्हान असेल त्याकडे सकारात्मकतेने पाहिले, असे श्री. फडणवीस म्हणाले.

विदर्भ, मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्यात यशस्वी ठरलो. हे काम सोपे नव्हते. राज्यातील १२ कोटी जनतेला दैवत मानून तिची सेवा करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गावर चालत, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा घेऊन, पंडित दीनदयाल यांच्या अंत्योदयचा विचार घेऊन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराचा आदर्श ठेवत आपण पाच वर्षे काम केले. वारीत जसे आपण सहभागी होतो, तसे राज्यकारभाराच्या वारीत आपण सहभागी झालो. यामुळे श्री पांडुरंगाचा आशीर्वाद लाभला, असे फडणवीस यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com